आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान सहा देशांच्या दौ-यावर रवाना; ब्रिक्स परिषदेलाही हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उझबेकीस्तानमध्ये स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान शावकात यांच्याशी चर्चा करताना मोदी. - Divya Marathi
उझबेकीस्तानमध्ये स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान शावकात यांच्याशी चर्चा करताना मोदी.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मध्य आशियातील सहा देशांच्या दौ-यावर रवाना झाले. त्यांचा हा आठ दिवसांचा दौरा असेल. त्यात रशियासह इतर महत्त्वाचे देश आहेत. त्याशिवाय ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीआे) बैठकीतही सहभागी होणार आहेत. उझबेकिस्तानपासून मोदी यांच्या दौ-याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ते मंगळवारी कझाकिस्तान नंतर रशिया, तुर्कमेनिस्तान, किर्गीस्तान आणि ताजिकिस्तानला भेट देतील. एससीआेची परिषद रशियातील उफा येथे होणार आहे. परिषदेच्या निमित्ताने भारताला सदस्यत्व मिळण्याची शक्यता आहे.
सध्या भारताकडे निरीक्षक एवढाच दर्जा आहे. दुसरीकडे ब्रिक्स परिषदेलाही पंतप्रधान हजेरी लावणार आहेत. आर्थिकदृष्ट्या ही परिषद महत्त्वाची आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्सचे सदस्य आहेत. आर्थिक क्षेत्रात पाच देशांत समन्वय साधून मोठी शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ब्रिक्स विकास बँकेची अगाेदरच स्थापना करण्यात आली आहे. पाच सदस्यीय देशांतर्गत स्थानिक चलनातून व्यवहाराच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाऊ शकते. बँकेचे अध्यक्षपद भारताचे के.व्ही. कामत यांच्याकडे आहे.

पुढे वाचा... पहिले पंतप्रधान