आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी सोशल साइट विबोवर पंतप्रधान मोदींची झलक! चीनी मित्रांशी संवाद साधण्याची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौ-यावर निघण्यापूर्वी सोमवारी चिनी सोशल साइट विबोवर आले अाहेत. मोदी यांनी टि्वटरवर याची माहिती दिली.त्यांनी विबोवर आपल्या होमपेजचे वेबशॉट अपलोड केले आहेत.

पंतप्रधानांनी विबोवर चिनी भाषेत लिहिले की, हॅलो चीन! मी चिनी मित्रांशी विबोवर संवाद साधण्यास इच्छुक आहे. यानंतर अल्पावधीत साधारण साडेचार हजार लोकांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यासोबत वादालाही प्रारंभ झाला. एका पोस्टमध्ये अरुणाचलला दक्षिण तिबेट संबोधण्यात आले. यात म्हटले की, अरुणाचल तर दक्षिण तिबेट आहे. ते आमचे आहे. मोदी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर १३ मे रोजी चीन, मंगोलिया आणि द. कोरियाच्या दौ-यावर रवाना होणार आहेत.

भगवान गौतम बुद्धांच्या प्रभावाचा आवर्जून उल्लेख
नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवारी भगवान गौतम बुद्धांच्या प्रभावाचा उल्लेख केला. ते म्हणाले, जन्मापासून आतापर्यंत बुद्धांचा व माझा विशेष संबंध आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हा गांधीनगरमध्ये सचिवालय परिसरात बुद्धांची मोठी मूर्ती बसवली होती. प्रवेश करतानाच मूर्तीचे दर्शन होते. मुख्यमंत्री निवासात प्रवेश करताना मूर्ती दिसते. लोकांचे त्याकडे लक्ष गेले नाही. अन्यथा, वाद निर्माण करत त्यांनी माझी चामडी सोलून काढली असती.
पंतप्रधान म्हणाले, माझा जन्म ज्या गावात झाला, तिथे काही काळ चिनी प्रवासी हवेनसांग राहत होते. पश्चिम भागातही बुद्धांचा प्रभाव होता.

परदेश दौ-यात बुद्ध मंदिर दर्शनाची विशेष सोय
पंतप्रधान म्हणाले, मी आशियात जिथे जिथे राहिलो, तेथील सरकारांनी माझ्या कार्यक्रमाचे नियाेजन करताना एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिले. जिथे कुठे भगवान बुद्धांचे मंदिर असेल तिथे मला ते घेऊन जात असत. मलाही हे चांगले वाटते. गुजरातचा मुख्यमंत्री असताना चीनला गेलो होतो. चीन सरकारने माझा सायंकाळचा एक कार्यक्रम बुद्ध मंदिरात ठेवला होता.

अल कायदाच्या व्हिडिओत मोदी...
अल कायदाच्या नव्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रथमच नाव आले आहे. हा व्हिडिओ अल कायदाची माध्यम शाखा अल-शबाबने पोस्ट केला आहे. दोन मे रोजी जारी केलेल्या फ्रॉम फ्रान्स टू बांगलादेश : द डस्ट विल नेव्हर सेटल डाऊन, शीर्षकाच्या या व्हिडिओमध्ये अल-कायदा इंडिया प्रमुख आसिम उमरचा आवाज आहे. मोदींच्या भाषणांचा संदर्भ देत आसिम म्हणाला, जगभरात मुस्लिमांविरुद्ध युद्ध सुरू आहे. युद्ध एकच आहे. भले ते ड्रोनने होवो की शार्ली हब्दोच्या लेखनीने किंवा नरेंद्र माेदींच्या जहाल वक्तव्यातून. दरम्यान, भारतीय गुप्तचर संस्था या व्हिडिओचा तपास करत आहेत.