आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या जवळ शरीफ; अनेकनिर्णय, पुढच्या वर्षी मोदी पाकला जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन नेत्यांची १३ महिन्यांतील ही तिसरी भेट ठरली. - Divya Marathi
दोन नेत्यांची १३ महिन्यांतील ही तिसरी भेट ठरली.
उफा - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शुक्रवारी रशियातील उफा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. ही भेट ३० मिनिटांची ठरली होती. प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांत ५५ मिनिटे संवाद झाला.

सार्क परिषदेसाठी पाकिस्तानला येण्याचे शरीफ यांचे निमंत्रण मोदींनी स्वीकारले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते उफामध्ये आले होते. उभय नेत्यांत १३ महिन्यांत तिसऱ्यांदा भेट झाली; पण ही दुसरीच द्विपक्षीय चर्चा ठरली. उभयतांतील ही चर्चा दहशतवाद या विषयावरच केंद्रित राहिली. जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड झकी-उर-रहमान लख्वी तसेच युद्धबंदीचे उल्लंघन हे मुद्देही चर्चेत आले.

परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत पाचसूत्री संयुक्त वक्तव्य जारी केले. दोघांनीही माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. गुरुवारीही रात्रभोजनानंतर दोघांची अनौपचारिक भेट झाली होती.

सार्क परिषदेच्या निमित्ताने पुढच्या वर्षी होणार दौरा
का? : काँग्रेस
५६ इंचांची छातीचा दावा करून जे सत्तेत आले, ते कचखाऊ निघालेे. इकडे लष्करप्रमुख शहीद जवानाला श्रद्धांजली वाहत होते, तेव्हा मोदी तिकडे गळाभेट घेत होते. मोदींनी शरीफांना चर्चेसाठी निमंत्रित केले अशी कोणती स्थिती होती?’
- मीम अफझल, काँग्रेस प्रवक्ते
नवे पर्व : भाजप
आजवर पाकने दहशतवादाची आपल्या सोयीने व्याख्या केली. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद मान्य नाही, ही आमची व्याख्या प्रथमच स्वीकारली . दोन्ही देशांतील संबंधात नवे पर्व सुरु होईल.’
- एम. जे. अकबर, भाजप प्रवक्ते
धडा शिकवा
मोदी व शरीफ भेटले हे दुर्दैवी आहे. स्थिती बदलली नाही; ती बदलण्यास मोदी सक्षम आहेत. सरकारने काही धडा घेतला की नाही हे माहीत नाही; परंतु पाकला धडा शिकवलाच पाहिजे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना
तीन महत्त्वाचे निर्णय
1.पुढील वर्षी सार्क परिषदेसाठी मोदी इस्लामाबादला जातील.
महत्त्व : जानेवारी २००४ मध्ये वाजपेयी पाकला गेले होते. १२ वर्षांनंतर भारताचे पीएम पाकला जातील. तेथे मोदींच्या चाहत्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे मोदी हा दौरा ऐतिहासिक बनवण्याचा प्रयत्न करतील.
2 .दहशतवादाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये चर्चा होईल.
महत्त्व : पाकचे सरताज अजीज यांचा दबदबा आहे. पाक लष्कराचाही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर सर्वमान्य तोडगा अपेक्षित आहे.
3.बीएसएफचे महासंचालक व पाक रेंजर्सच्या प्रमुखांची चर्चा. त्यानंतर डीजीएमओचीही भेट.
महत्त्व : आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीच्या उल्लंघनावर दोघे आमने-सामने येतील. सीमेवर शांततेच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची ठरेल.

पुढे वाचा... मोदी निमंत्रण स्वीकारतील असे वाटलेही नाही!
बातम्या आणखी आहेत...