आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाईट हाऊसमध्ये मोदी 5 तास थांबले, 3 वेळा ट्रम्प यांची गळाभेट, दोघांनी परस्परांचे केले गुणगाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- पंतप्रधान मोदी ५ तास व्हाइट हाऊसमध्ये होते. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची त्यांनी या वेळेत तीनदा गळाभेट घेतली. त्यांच्या एकूण देहबोलीवर न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले की, हा उत्साह चीनला खिजवण्यासाठीच होता. त्याची प्रतिक्रिया उमटली. चिनी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने ‘भारत अमेरिकेचा मोहरा बनल्यास याचे परिणाम विनाशकारी होतील,’ असा इशारा दिला.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले...
- मोदी महान पंतप्रधान आहेत. मी त्यांच्याबद्दल वाचत असतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या नेत्याचे स्वागत करणे भाग्य समजतो. व्हाईट हाऊसचे तुम्ही खरे मित्र.
- भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याबद्दल मोदींना लाखो शुभेच्छा. मी मोदींना सलाम करतो. मी आणि मोदीच सोशल मीडियाचे वर्ल्ड लिडर आहोत.

नरेंद्र मोदी म्हणाले...
ट्रम्प यांच्या महान नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील राजनैतिक सहकार्याला नवी सकारात्मक बळकटी मिळेल. आपला व्यावसायिक क्षेत्रातील दांडगा अनुभव दोन्ही देशांतील सर्वच क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने निश्चितपणे मदतीचा ठरेल.

चीनला खिजवण्यासाठी ट्रम्प-मोदी उत्साहात भेटले
- अन्य देशांप्रमाणे भारतालाही ट्रम्प यांच्या निर्णयांबाबत चिंता आहे. ट्रम्प यांच्या व्हिसाबंदी व पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयांनी भारताची चिंता वाढवली आहे.
- सध्याच्या स्थितीत चीनच्या सागरी महत्त्वाकांक्षांना मुरड घालणे हे भारत व अमेरिकी नेत्यांचे एकत्र येण्यामागचे समान कारण आहे. 

गळाभेट घेऊन चकित केले
ब्रिटिश वृत्तपत्र फायनान्शियल टाइम्सने लिहिले की, ट्रम्प यांना हस्तांदोलन करणेही आवडत नाही. मात्र, मोदींनी ट्रम्प यांची गळाभेट घेतल्याने त्यांचा नाइलाज झाला.

भेटीनंतर ट्रम्प यांनी एकही टि्वट केले नाही, मोदींचे १० टि्वट
ट्रम्प यांनी मोदी यांच्या भेटीनंतर २० तास एकही टि्वट केले नाही. मोदींनी मात्र यादरम्यान दौऱ्याशी संबंधित १० टि्वट केले. ८ टि्वटमध्ये मोदी-ट्रम्पचे छायाचित्र होते.
 
बातम्या आणखी आहेत...