आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यासाठी मोदींनी पाहिला इतिहास; प्रोटोकॉल मोडून भेटले चीनी राष्ट्रपती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शियान- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर शियानला पोहोचले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे हे गृहनगर आहे. त्यांनी शिष्टाचार मोडून मोदींचे उत्साहात स्वागत केले. भारत दौऱ्यात मोदींनी जिनपिंग यांना अहमदाबादची सफर घडवली होती, तशीच शियानची सफर जिनपिंग यांनी मोदींना घडवली.

उभय नेत्यांत दीड तास चर्चा झाली. त्यानंतर मोदी आणि जिनपिंग बीजिंगला रवाना झाले. चर्चेनंतर मोदी आणि जिनपिंग शियानचा २००० वर्षे जुना वाइल्ड गूज पॅगोडा पाहायला गेले.

तेथे ह्युआन त्सांगने लिहिलेले ऐतिहासिक दस्तएेवज आहेत. चर्चेत मोदींनी सीमाप्रश्नाचा मुद्दाही उपस्थित केला. सीमाप्रश्नावर तोडग्यास वेळ लागणार असल्याने हा मुद्दा उपस्थित करणार नाही, असे मोदींनी भारतातून रवाना होण्यापूर्वी सांगितले होते.

तुम्ही गुजरातेत कसा काय चमत्कार केला? असा प्रश्न जिनपिंग यांनी अगदी सहजपणे मोदींना विचारला. त्याचवेळी भारताच्या आक्षेपानंतरही पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन ४६ अब्ज डॉलरची गुंतवणूक का करत आहे? असा सवाल मोदींनी जिनपिंग यांना केला. अरूणाचल प्रदेशातील लोकांना स्टेपल्ड व्हिसा देण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला.चर्चेत मोदींनी सीमाप्रश्नाचा मुद्दाही उपस्थित केल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले.

माेदी- जिनपिंग यांची एका वर्षातील तिसरी भेट
मोदी आणि जिनपिंग यांच्यातील एक वर्षातील ही तिसरी भेट होती. मागच्या वर्षी जुलैमध्ये ब्राझील आणि सप्टेंबरमध्ये भारतात दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. भारत दौऱ्यात शिष्टाचार मोडून मोदींनी जिनपिंग यांचे अहमदाबादेत स्वागत केले होते. दोन्ही नेत्यांनी झोपाळाही खेळला होता.

खुल्या वातावरणात दिलखुलास चर्चा; सीमाप्रश्नही उपस्थित
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती चीनचे शी जिनपिंग यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. त्याचा तपशील नंतर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी िदला. ते म्हणाले की, अडचणींच्या मुद्द्यांवर मोकळेपणाने चर्चा झाली. परस्पर विश्वास वाढवण्यावर चर्चेचा भर होता. अंतर्गत, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी खुलेपणाने विचार विनिमय केला.