आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटिश राजकुमार प्रिन्स हॅरीचा साखरपुडा, मार्च 2018 मध्ये होणार शाही विवाह सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅरी आणि मेघनचा साखरपुडा झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. - Divya Marathi
हॅरी आणि मेघनचा साखरपुडा झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटिश राजकुमार हॅरी आणि अभिनेत्री मेघन मार्कल यांचा साखरपुडा झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. मेघन प्रिन्स हॅरीपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. नुकतेच आपल्या लग्नाचा 70 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या राणी एलिझाबेथ यांनी लग्नाला होकार दिला आहे. ब्रिटिश दैनिक डेली मेलच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यातच प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचा साखरपुडा झाला. त्याचवेळी राणी एलिझाबेथ यांनी दोघांना आशीर्वाद दिला. त्याच्या एका आठवड्यानंतर आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या दोघांचा विवाह पुढच्या वर्षी मार्चमध्ये होणार असे जाहीर करण्यात आले आहे. 

 

कोण आहे मेघन मार्कल?
> मेघन मार्कल एक अभिनेत्री, मॉडेल आणि समाजसेविका आहे. तिचा जन्म 4 ऑगस्ट 1981 रोजी अमेरिकेती कॅलिफोर्निया प्रांतात झाला. 
> विविध टीव्ही सीरियल आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मेघनने 2011 मध्ये चित्रपट निर्माता ट्रेव्होरशी विवाह केला होता. मात्र, दोन वर्षांतच दोघांनी फारकत घेतली. यानंतर तिने टोरॉन्टो येथील एका शेफला डेट केले. 
> वर्षभरापूर्वीच एका मैत्रिणीने हॅरी आणि मेघनची भेट करून दिली होती. यानंतर विविध ठिकाणी दिसून आलेल्या हॅरी आणि मेघनच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.
> प्रिन्स हॅरी ब्रिटिश राजघराण्यात 5 वा वारसदार आणि पाचवी सर्वात महत्वाची व्यक्ती असल्याने त्याच्या लग्नाला राणी एलिझाबेथची मंजुरी मिळणे आवश्यक होते. गेल्या आठवड्यातच राणीने ती मंजुरी दिली.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मेघनच्या माजी पतीचे आणि मेघनचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...