आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आईच्या मृत्यूनंतर कोसळण्याच्या मार्गावरच होतो’, राजकुमार हॅरी यांचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - आई डायनाच्या १९९७ मध्ये झालेल्या मृत्यूनंतर  मी जवळजवळ संपूर्णपणे कोसळून पडण्याच्या मार्गावरच होतो वा त्या स्थितीच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो होतो, यात माझ्या व्यक्तिगत कामावरही अनिष्ट परिणाम होत होता आणि या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी चार वर्षांपूर्वीपर्यंत आपण समुपदेशन करत होतो, मात्र आता आपण उत्तम आहोत, असे राजपुत्र हॅरी यांनी म्हटले आहे.  
 
प्रिन्सेस ऑफ वेल्स आणि आपली आई डायनाच्या मृत्यूनंतर साधारणत: दोन दशकांपासून आपण आपल्या भावना, संवेदना दाबून ठेवल्या होत्या. या काळात आपले मोठे बंधू राजकुमार विल्यम्स यांनीदेखील आपल्याला या कठीण काळातून बाहेर येण्यास मदत केली, असे ३२ वर्षीय राजपुत्र हॅरी यांनी ‘टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अंत्ययात्रेत मी प्रिन्सेस डायनाच्या शवपेटीच्या मागून चाललो होतो.  
 
या सर्व गोष्टी सहजपणे उघड करताना, सत्य सांगताना हॅरी म्हणाले की, ‘या मानसिक स्थितीतून बाहेर येण्यासाठी मी मुष्टियुद्धाचीही मदत घेतली आणि व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञांनाही बोललो होतो. वयाच्या २८ व्या वर्षानंतरच मी या धक्क्यातून स्वत:ला सावरू शकलो.
बाराव्या वर्षी आई डायनाला गमावल्यानंतर २० वर्षे माझ्या भावना, संवेदना जणू बंदच करून टाकल्या  होत्या. त्यामुळे मी जवळजवळ मानसिकदृष्ट्या कोसळण्याच्याच मार्गावर होतो. ‘शाही जीवनाच्या दबावासह जेव्हा चहूबाजूंनी तुमच्याकडे दु:ख आणि खोटारडेपणाच येतो, तेव्हा तुम्ही कोसळूनच पडता. २० वर्षांच्या या दु:खद प्रवासानंतर माझ्याबाबत काय चुकीचे घडले आहे ते माझ्या लक्षात आले,’ अशी टिप्पणीही राजकुमार हॅरी यांनी केली.
 
बातम्या आणखी आहेत...