आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prince Majid Of Saudi Arab Threatens Women Staff

पुरुषाबरोबर संबंध; सौदीच्या प्रिन्सने महिलांना दिली होती जीवे मारण्याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबचे प्रिन्स माजीद. - Divya Marathi
सौदी अरबचे प्रिन्स माजीद.
लॉस एंजल्स - एका पुरुष सहकाऱ्याबरोबर सेक्श्युअल संबंध ठेवल्याच्या आरोप असलेले सौदी अरबचे प्रिंस माजीद यांच्यावर तीन महिला स्टाफनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. प्रिन्स माजीद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुलाजीज अल सऊद या पुरुष सहकाऱ्याबरोबर पकडले होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक प्रपोजल दिले. ते फेटाळल्यानंतर आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. महिला स्टाफमधील एका मेंबरने सांगितले की, माजीद म्हणाले, मी प्रिन्स आहे आणि मी पाहिजे ते करू शकतो. उद्या मी तुमच्याबरोबर पार्टी करेल तेव्हा तुम्हालाही मी सांगेल ते सर्व करावे लागेल नसता मी तुम्हाला मारून टाकेन. प्रिन्सवर लॉस एंजल्सच्या एका मॅन्शनमध्ये महिला स्टाफबरोबर गैरवर्तन केल्याचा खटला सुरू आहे.

प्रिन्सवर लागलेले इतर आरोप
> डेली मेल बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले आहे की, बेव्हेर्ली हिल्सवर 37 मिलियन किमतीच्या घरात प्रिन्स कायम मौज मस्ती करण्यास बुडालेला असतो.
> प्रिन्सवर यापूर्वीही घरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे.
> प्रिन्सने 21 ते 22 सप्टेंबरदरम्यान पार्टी केली होती. त्यादरम्यान त्याने साथीदारांसह कोकेन घेतले आणि दारु प्यायला होता असा दावा करण्यात आला आहे.
> तीन महिला स्टाफच्या वकिलांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये आरोप करण्यात आला आहे की, प्रिन्सने त्यांच्यावर दारू फेकण्याचा प्रयत्नही केला होता.
> एका वुमन स्टाफने सांगितले की, प्रिन्सने मला धमकी दिली की, जर मी पार्टीला नकार दिला तर तो मला मारून टाकेल. त्यानंतर प्रिन्सने माझी छेड काढायला सुरुवात केली.
> स्टाफने सांगितले, जेव्हा मी त्याला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, मी प्रिन्स आहे आणि तु कोणीही नाहीस. मी हवे ते करू शकतो.
> तीन महिलांनी दावा केला की, प्रिन्स त्याच्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर आक्षेपार्ह स्थितीत होता. एवढेच नाही तर प्रिन्सने त्यांना बळजबरी खोलीत थांबायला आणि पाहायला भाग पाडले. सौदी अरबमध्ये होमोसेक्श्युअालिटी अवैध आहे आणि यात दोषी आढळल्यास कडक शिक्षेची तरतूद आहे.

कोण आहे प्रिन्स माजीद
> डेली मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार प्रिन्स माजीद एकेकाळी सौदीचे किंग असलेल्या अब्दुल्लाह यांचा मुलगा आहे.
> किंग अब्दुल्ला यांची जानेवारी महिन्यात वयाच्या 90 व्या वर्षी मृत्यू झाला आहे.
> प्रिन्सवर 2009 मध्ये स्टाफमधील बैंदर अब्दुल्लाजीज याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता.
> प्रिन्स माजीदला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. या घटनेत त्याच्याबरोबर पीडित महिला जखमी अवस्थेत अाढळली होती. पण या आरोपांमधूनही प्रिन्स मुक्त झाला.
> लॉस एंजल्सच्या डीस्ट्रीक्ट अॅटर्नींकडून त्याच्या विरोधातील आरोप फेटाळण्यात आले होते. आता नव्या आरोपांनुसार त्यांच्यावर नव्या खटल्याची तयारी सुरू आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO