आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केट मिडलटनला लागले तिसऱ्या आपत्याचे डोहाळे, सट्टा बाजारात या नावाची आहे चर्चा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केन्सिंगटन पॅलेसने ही घोषणा केली. - Divya Marathi
केन्सिंगटन पॅलेसने ही घोषणा केली.
लंडन - ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि त्यांच्या पत्नी केट मिडलटन यांना तिसरे आपत्य होणार आहे. केन्सिंगटन पॅलेसने सोमवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. डचेस ऑफ केमब्रिज गर्भवती असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असल्याचे पॅलेसतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या शाही कपलला प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस चॅरलोट अशी दोन आपत्ये आहेत.
 
 
सट्टा बाजार रंगला, प्रिन्स हॅरीला फटका
- प्रिन्स जॉर्ज याच आठवड्यात शाळेत जाणार आहे. तर, त्याची बहिण प्रिन्सेस चॅरलोट एलिझाबेथ डायना मे महिन्यात 2 वर्षांची होत आहे. क्वीन एलिझाबेथसह शाही घराण्यातील सगळेच केट आणि विल्यम यांच्या तिसऱ्या आपत्याच्या चाहुलमुळे अतिशय उत्साही आहेत असे केन्सिंगटन पॅलेसने जाहीर केले. 
- डेली मेल आणि इतर इंग्रजी दैनिकांनी दिलेल्या वृत्तानुसार, केट आणि विल्यमचे तिसरे आपत्य एप्रिल 2018 मध्ये येणे अपेक्षित आहे. ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केट गरोदर असल्याचे वृत्त पसरताच ते मुलगा असणार की मुलगी आणि नाव काय असणार इथपर्यंत सट्टा बाजार रंगला आहे. त्यामध्ये ती मुलगी असणार आणि तिचे नाव अॅलिस ठेवणार यावर सर्वाधिक बोली लावली जात आहे.
- विल्यमच्या घरात तिसरे आपत्य येताच काका प्रिन्स हॅरी राज मुकूटासाठी पाचव्यावरून सहावा वारसदार होणार आहे. तर, नुकतेच कायद्यात झालेल्या बदलांमुळे प्रिन्सेस चॅरलोट चौथी दावेदार राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...