आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराज्ञी डायनाच्या पत्रांचा विक्रमी लिलाव, सहा पत्रांची सुमारे साडेबारा लाखांत विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- दिवंगत युवराज्ञी डायनाने लिहिलेल्या पत्रांचा लाखो रुपयांत लिलाव होणार आहे. विल्यम आणि हॅरीच्या बाललीला पाहून हरखून जाणाऱ्या मातेचे हृदय त्या पत्रातून दिसून येते. लिलावात सहा पत्रे सुमारे १२ लाख ६३ हजार ९६१ रुपयांमध्ये विकण्यात आली आहेत. 
डायनाने सायरिल डिकमनला लिहिलेली ही पत्रे आहेत. बकिंगहॅम राजवाड्यात डिकमन पन्नास वर्षे कार्यरत होते. डायनाने आपल्या बाळांिवषयी पत्रातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. थोरला विल्यम तान्हुल्या हॅरीला असंख्य वेळा आलिंगन देतो. त्याचा सारखा गोडगाेड पापा घेतो.

हॅरी शाळेत प्रचंड खोड्या करतो, अशा शब्दांत तिने पत्रातून आपल्या मुलांच्या खोडकर गोष्टी सांगितल्या आहेत. डायनाने स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रांचे एकूण सहा संच आहेत. २० सप्टेंबर १९८४ च्या पत्रात ती हॅरीच्या जन्मानंतरची भावना काहीशा अशा शब्दांत मांडते-‘माझ्या दारी आलेल्या असंख्य फुलांची स्पंदने माझ्या कानी पडू लागली आहेत.’ १९९२ ला दोन्ही मुले बोर्डिंगमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेत होती. पण तेव्हा देखील हॅरीचा खोडकरपणा कमी झालेला नव्हता. त्याची चिंता डायनातील आईला चिंताग्रस्त करणारा होता, हे काही पत्रातून लक्षात येते.  दरम्यान, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिकेतील काही इच्छूकांनी पत्रांसह इतर साहित्य खरेदीची तयारी दर्शवली आहे. या साहित्यामध्ये काही नाताळमधील शुभेच्छा पत्रे, छायाचित्रे देखील आहेत. त्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. इंटरनेटवर त्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजघराण्यातील ३० वर्षांचा कालखंड त्यातून दिसून येतो.  

महाराणी एलिझाबेथ यांचीही पत्रे  
ब्रिटिश राजघराण्यातील पत्रांचा लिलाव ही आमच्या दृष्टीने अत्यंत धाडसाची गोष्ट आहे. कारण लोकांना आतापर्यंत राजमहालातील भावनांना अशा प्रकारे जवळून जाणून घेण्याची संधी मिळालेली नव्हती. पत्रांना लिलावात ठेवण्यात आले. इंटरनेटवर ही प्रक्रिया होणार असल्याने जगभरातून त्याला प्रतिसाद मिळाला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय व प्रिन्स चार्ल्स यांच्यातील पत्रापत्री देखील लिलावात आहे. त्याची अंदाजित रक्कम १० लाख रुपयांहून अधिक आहे, अशी माहिती शेफिन्स येथील फाइन आर्टचे संचालक ल्यूक मॅकडोनाल्ड यांनी दिली.  
 
बातम्या आणखी आहेत...