आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमारीने प्रेमासाठी शाही दर्जा धुडकावला; सामान्य तरुणाशी साखरपुड्याची घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेकियाे- जपानची राजकुमारी माकाेने रविवारी एका सर्वसामान्य युवकाशी अापला साखरपुडा हाेणार असल्याची घाेषणा केली. त्यामुळे जपानमधील राजघराण्यात असलेल्या पुरुषसत्ताक कायद्यानुसार माकाेला अापला शाही दर्जा साेडावा लागेल. हा कायदा तेथे शाही पुरुषांना लागू हाेत नाही.

माकाे (२५) ही सम्राट अकिहिताेंची सर्वात माेठी नात व दुसरा मुलगा राजकुमार अकिशिनाेची सर्वात माेठी मुलगी अाहे. रविवारी टीव्हीवर प्रसारित एका पत्रकार परिषदेत अापल्या साखरपुड्याची घाेषणा करताना या निर्णयामुळे मला खूप अानंद हाेत असल्याचे तिने देशभरातील नागरिकांना सांगितले. तसेच लग्नासाठी मला शाही दर्जा साेडावा लागेल, हे मला लहानपणापासून माहीत हाेते. तथापि, राजघराण्याची सदस्य म्हणून परिवाराप्रती असलेल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न केला. सध्या मी माझ्या जीवनाचा भरभरून अानंद घेत अाहे, असेही माकाेने या वेळी स्पष्ट केले.  त्याचप्रमाणे तिचा भावी जीवनसाथी असलेला व एका लाॅ कंपनीत काम करणारा केई काेमुराे (२५) याने माकाेला चंद्राची उपमा देऊन सांगितले की, मी तीन वर्षांपूर्वीच राजकुमारीसमाेर लग्नाचा प्रस्ताव ठेवला हाेता. तसेच काेमुराेचे हास्य सूर्याप्रमाणे अाहे, असे सांगून जुलैतच अामची लग्न करण्याची याेजना हाेती. मात्र, त्याच महिन्यात देशातील दक्षिण भाग मुसळधार पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याने हा िर्णय मागे घेतला, असे माकाेने सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...