आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पसार होण्याच्या प्रयत्नात असा अडकला कैदी, फोनमध्ये रेकॉर्ड करताना हसत होते पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - ब्राझीलचे तुरुंग कैदी पसार होण्याच्या घटनांवरून नेहमीच चर्चेत असतात. कैदी पसार होण्यासाठी नानाविध प्रकारच्या शक्कल लढवतात. असाच प्रकार येथील कासा डी डी कस्टडिया तुरुंगात घडून आला आहे. तुरुंगातील 10 कैदी छत फोडून पसार होणारच होते. त्याचवेळी त्यांची एक चूक पोलिसांनी पकडली आणि त्यांचा हा प्लॅन सपशेल हाणून पाडण्यात आला आहे.
 

एक कैदी अडकला
- जेलमध्ये 10 कैद्यांची एक टोळी पळून जाण्याच्या तयारीत होती. यासाठी त्यांनी काँक्रीटचे छत खोदून त्यांनी मोठे होल केले होते.
- एक-एक करून ते यातून बाहेर निघत होते. त्यापैकी 8 कैदी बाहेर पडण्यात यशस्वी देखील ठरले. मात्र, यानंतरच्या त्यांचा एक सहकारी त्यामध्ये अडकला आणि मोठ-मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. 
- कैद्याचा आवाज पोलिसांपर्यंत पोहोचला, सगळेच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी त्या सेलपर्यंत पोहोचले. 
- विशेष म्हणजे, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले नाही, तर चक्क आपले मोबाईल काढून हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात टिपला. 
- छताच्या खड्यातून बाहेर निघण्याचा केविलवाना प्रयत्न करणाऱ्या या कैद्याला पाहून पोलिस अक्षरशः हसत होते. यानंतर त्या सर्वांना पकडून पुन्हा दुसऱ्या सेलमध्ये डांबण्यात आले. 
 

क्षमतेपेक्षा 3 पट कैदी
- जेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, तुरुंगात वाढत्या गर्दीमुळे कैदी नेहमीच पळ काढण्याचा प्रयत्न करतात. 
- कैदी फरार होण्याचा प्रयत्न करण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना होती. यापूर्वीच्या दोन्ही वेळा पोलिसांना कैद्यांना पकडले होते.
- ‘कासा डी कस्टडिया’ तुरुंगाची क्षमता 336 कैद्यांची आहे. तरीही यात 1036 कोंबण्यात आले आहेत. 
- पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांना आता वेग-वेगळ्या सेल्समध्ये ठेवण्यात आले आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...