आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुरुंगाच्या छतावर उतरले हेलिकॉप्टर, गार्डच्या समोर कैदी गेले पळून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरँटो - कॅनडामध्‍ये डोक चक्रावून देणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात चक्क दोन कैदी हेलिकॉप्टरच्या मदतीने तुरुंगातून पळून गेले. हेलिकॉप्टर क्युबेक तुरुंगाच्या छतावर उतरते आणि सहा मिनिटांनंतर उड्डाण घेऊन जाते. दोन सुरक्षारक्षक हे सर्व पाहात असतात. त्यांना रोखण्‍याऐवजी ती मदत करताना दिसत आहेत. व्हिडिओ तीन वर्ष जुना आहे. मात्र तो बुधवारी सार्वजनिक करण्‍यात आला. कसे पळाले कैदी...
- 38 वर्षांचा बेंजामिन ह्युडन बार्बीयू आणि डॅनी प्रोवेंकल नावाच्या दोन कैद्यांवर हत्येचा खटला चालू होता.
- मार्च 2013 मध्‍ये कैदी पळून जाण्‍याच्या घटनेच्या बातम्या आंतरराष्‍ट्रीय प्रसारमाध्‍यमांमध्‍ये आल्या होत्या.
- त्यांच्या दोन सशस्त्र सहका-यांनी एक हेलिकॉप्टर हायजॅक केले आणि वैमानिकाला तुरुंगाकडे उड्डाण घ्‍यायला लावले.
- हेलिकॉप्टर छतावर उतरले. दुसरीकडे दोरीच्या मदतीने ते खिडकीतून बाहेर पडून छतावर चढण्‍याचा प्रयत्न करतात.
- या घटनेनंतर काही तासांमध्‍ये कैदी आणि त्यांचे सहकारी पकडले जातात.
- दोन्ही कैद्यांनी आपली चूक मान्य केली. दुसरीकडे तुरुंग फोडणारा सूत्रधार बिल बिओडूइनला यावर्षी जानेवारीत दोषी असल्याचा सिध्‍द झाले.
- चौथा व्यक्ती स्टीवन मॅथ्‍यूने कैद्यांना पळून जायला मदत केल्याचे मान्य केले. त्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली.
पुढे पाहा घटनेचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...