आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चोप्रा युनिसेफची जागतिक सदभावना दूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे । बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची युनिसेफची जागतिक सद््भावना दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जगातील उत्पीडित मुलांचा ‘सामूहिक आवाज’ बनून आगामी पिढीच्या उज्ज्वल भवितव्याच्या निर्मितीसाठी हातात हात घालून काम करूया, असे आवाहन प्रियंकाने जगभरातील देशांना केले आहे.

‘मुले स्वतंत्र राहिली पाहिजेत. त्यांना विचार करण्याचे, जीवन जगण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. मानवाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. तरीही जगात मुले हिंसाचार, दुर्व्यवहार व शोषणामुळे असुरक्षित आहेत. चला मानवतेचा अंगीकार करूया. अन्यायाविरुद्ध लढाई लढूया आणि आपल्या मुलांसाठी एक चांगले जग निश्चित करूया.’
- प्रियंका चोप्रा, युनिसेफची जागतिक सद‌्भावना दूत
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...