आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदर्याच्या जोरावर शत्रूंचे सीक्रेट मिळवायची ही नर्तकी, झाली होती निर्घृण हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माता हारी हिचे नाव महिला गुप्तहेरांच्या यादीत आजही सर्वात वर आहे. 7 ऑगस्ट 1876 ला नेदरलंडमध्ये जन्मलेली आणि पॅरिसमध्ये लहानाची मोटी जालेली मार्गरेट जेले (माता हारी) पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीची एक एजंट होती. शारिरीक संबंधांच्या माध्मातून तिने हेरगिरीची एक नवी व्याख्याच तयार केली होती. तिच्या मृत्यूचे कारणही हेरगिरीच ठरले. तशी ती अगदीच आरसपाणी सौंदर्याची राणी नव्हती. उलट जास्त सुंदर नसल्याच्या कारणामुळे तिला एका डान्सग्रुपमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यामुळे तिला नाइलाजाने सर्कसमध्ये काम करावे लागले होते.

नवऱ्याशी घटस्फोट
जेलेचा विवाह नेदरलंडच्या शाही लष्करातील एका अधिकाऱ्याबरोबर झाला होता. तो इंडोनेशियामध्ये तैनात होता. ते दोघे तत्कालीन डच ईस्ट इंडीजचे बेट असलेल्या जावामध्ये राहत होते. इंडोनेशियामध्येच ती एका डान्स कंपनीमध्ये सहभागी झाली होती आणि नाव बदलून माता हारी ठेवले होते. मलय भाषेत माता हारीचा अर्ख दिवसाचा डोळा म्हणजेच सूर्य असा होतो. नेदरलंडला परतल्यानंतर तीने 1907 मध्ये तिच्या पतीला घटस्पोट दिला आणि डान्सर म्हणून ती पॅरिसला गेली.

एका रात्रीत मिळाले यश
पॅरिसमध्ये तिने सौंदर्य आणि मनमोहक अदाकारीच्या जोरावर उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यामुळे एका रात्रीच ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या यशाने ‘एक्झॉटीक डान्स’ शैलीलाही एका उंचीवर नेऊन ठेवले. यादरम्यान माता हारीचे अनेक प्रमुख लष्करी अधिकारी, नेते आणि इतर मोठ्या व्यक्तींशी संबंध आले. त्यात जर्मनीच्या प्रिन्सचाही समावेश होता. पहिल्या महायुद्धात नेदरलंड तटस्थ होता. माता हारीने फ्रान्स, नेदरलँड्स आणि स्पेनदरम्यान अनेकदा प्रवास केला.

हेरगिरीच्या शंकेने हत्या
एकदा स्पेनला जाताना तिला इंग्लंडच्या फालमाउथ बेटावर अटक करण्यात आली. तिच्यावर हेरगिरीचा आरोप होता. तिला लंडनला आणण्यात आले. फ्रान्स आणि ब्रिटीश गुप्तचर संस्थांना माता हारी जर्मनीसाठी हेरगिरी करत असल्याची शंका होती. पण त्यांच्याकडे पुरावे नव्हते. तरीही तिच्यावर डबल एजंट असल्याचा आरोप करण्यात आला आणि फ्रान्समध्ये फायरिंग स्क्वाडमार्फत गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली. तिच्या अंत्यसंस्कारासाठीही तिच्या कुटुंबातील कोणीही समोर आले नव्हते. माता हारीचे चरित्र लिहिणारे लेखक रसेल वारेन हाउ यांनी 1985 मध्ये फ्रान्स सरकारला हे मान्य करण्यास भाग पाडले की, माता हारी निर्दोष होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, माता हारी यांचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...