आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात गोमांस तर इतर देशांत या प्राण्यांचे मांस खाण्यावरून आहेत वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी नुकतेच गोमांस खाण्याबाबत वक्तव्य दिल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे. गोमांस खाण्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे यावर लादलेल्या बंदीबाबत पुन्हाएकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात गोमांसावर बंदी लावल्यानंतर देशातील इतर राज्यांतही यावर बंदी लादण्याचा विचार सुरू झाला आहे. त्याबाबत विविध मतेही समोर येत आहेत.

प्राण्यांच्या मांसावर बंदी लादणारा भारत हा एकमेव देश नाही. जगातील इतरही काही देशांत प्राण्यांचे मांस खाण्याबाबत धार्मिक मुद्याला धरून काही वाद आहेत. त्यामुळे जगभरातील विविध भागांत तेथील प्रथांनुसार विविध प्राण्यांचे मांस खाण्याबाबात विवाद आहेत.

कुत्रा
काही देशांमध्ये असलेल्या धार्मिक प्रथांमुळे कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी अाहे. इस्लाम आणि बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार येथे कुत्र्याच्या मांसावर बंदी असते. इंडोनेशियातही कुत्र्याचे मांस खाण्याबाबात वाद आहेत. मात्र, व्हिएतनाम, चीन तसेच उत्तर आणि दक्षिण कोरियातही हे मांस चांगलेच पसंत केले जाते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या देशांत कोणत्या प्राण्याच्या मांसावर आहे बंदी...