आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये धर्मप्रचारक गटांवर निर्बंध येणार, इंटरनेट वापरण्यास मनाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - दहशतवादाच्या विरोधातील लढाईला आणखी पुढे नेताना ब्रिटनने धर्मप्रचारक गटांवर निर्बंध आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार अशा गटांना इंटरनेट वापरास तसेच मुलांसोबत कार्य करण्यास मनाई केली जाऊ शकते.

पंतप्रधान डेव्हिड कॅमरून सोमवारी देशाचे दहशतवादासंदर्भातील नवीन धोरण जाहीर करतील. विखारी प्रचार करणाऱ्या धर्मगुरूंना काळ्या यादीत टाकण्याची सरकारची योजना आहे. कट्टरवादी विचारांचा प्रचार करणाऱ्या गटांवर बंदी आणण्याचे आदेशही त्यामार्फत दिले जातील. दहशतवादाच्या विरोधात लढा देणाऱ्या धर्मादाय संस्था किंवा गटांना ब्रिटन सरकारकडून ५० लाख पौंडांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता दहशतवादाच्या विरोधात अतिशय व्यवस्थितपणे लढण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण प्रथम जागृत होणे गरजेचे आहे. ब्रिटन-अमेरिका यांची अशीच मोहीम आहे.

मंत्री पातळीवरही प्रयत्न सुरू
कॅमरून यांनी सरकारमधील मंत्र्यांची दहशतवादाविरोधातील लढाईत पूर्ण मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक मंत्रालयाने कट्टरवादी विचारांना ऑनलाइन स्थान मिळणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.