आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टि‌्वटरवरून लसीकरणाबाबत नकारात्मकतेचा प्रचार; नवीन मातांमध्ये उदासीनता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन - टि्वटरसह अन्य साेशल मीडिया वेबसाइट्सवर लसीकरणाविराेधात नकारात्मकतेचा भाव असून, ताे भाव वाढत असल्याचे एका अभ्यासातून समाेर अाले अाहे. त्यात नवीन माता लसीकरणाबाबत सर्वात जास्त उदासीन असल्याचे अाढळून अाले अाहे.  
 
याबाबत कॅलिफाेर्निया, कनेक्टिकट, मॅसाच्युसेट्स, न्यूयाॅर्क व पेनसिल्व्हेनियात पाच वर्षे करण्यात अालेल्या अभ्यासात नवीन मातांनी टि्वटरसह अन्य साेशल मीडिया वेबसाइट्सवर लसीकरणाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्याचे समाेर अाले. नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात अमेरिकेतील या प्रांतांतील मातांचे प्रमाण जास्त अाहे. याबाबत अाॅनलाइन चर्चाही करण्यात अाली. त्यात अनेक नागरिकांनी लसीकरणाबाबत नकारात्मकता दर्शवली, असे अमेरिकेतील काेलाेरॅडाे बुल्डर विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक क्रिस व्हर्गाे यांनी सांगितले. 
 
लसीकरणाबाबतच्या या वादविवादात अर्ध्याहून अधिक मते नकारात्मक हाेती, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे संशाेधन ‘साेशल सायन्स अँड मेडिसीन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. हा अभ्यास अमेरिकेत सन २००९ ते २०१५ दरम्यान करण्यात अाला. १९९८मध्ये १२ मुलांवर करण्यात अालेल्या एका अभ्यासात काही लसींमुळे अात्मकेंद्रित वृत्ती वाढू शकते, तसेच रुबेलासारख्या काही अाजारांत लसीकरण तारुण्याच्या विकासावर परिणाम करू शकते, असे नमूद करण्यात अाले हाेते. हा अभ्यास दाेन दशकांपासून लसीकरणाविराेधात काम करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला हाेता. याशिवाय लसीकरणाचा अात्मकेंद्रितवृत्तीशी काही संबंध अाहे काय, हे शाेधण्याचा प्रयत्नही संशाेधकांनी केला. मात्र, त्यात फारसे काही हाती लागले नाही, असे अल्बामा विद्यापीठाचे अाॅटिझम (अात्मकेंद्रित वृत्ती)चे संशाेधक थिअाेडाेर टाेमेनी यांनी सांगितले.
 
ही केवळ अंधश्रद्धा...  
लसीकरणाचा व अात्मकेंद्रितवृत्तीचा जवळचा संबंध असल्याची भावना अमेरिकेत दिसून येत अाहे. लसीकरणाविराेधात काम करणाऱ्या काही संस्थांनी हे खरे असल्याचे सांगितले. मात्र, संशाेधकांनी याबाबत केलेल्या अभ्यासात असे काहीही अाढळून अाले नाही. लसीकरणाने अात्मकेंद्रित वृत्ती वाढत असल्याचा काेणताही पुरावा संशाेधकांना अाढळला नाही. तसेच या दाेघांचा काही संबंध असल्याचेही त्यांनी नाकारले.
बातम्या आणखी आहेत...