आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ मुंबईतच नव्हे तर सौदीसह अनेक देशांमध्येही आहे दाऊदची Property

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - दाऊदने इकबाल मिर्चीबरोबर इंपेरिअल सूट्स नावाने फाइव्ह स्टार हॉटेल सुरू केले होते. (इनसेट दाऊद) - Divya Marathi
फाइल फोटो - दाऊदने इकबाल मिर्चीबरोबर इंपेरिअल सूट्स नावाने फाइव्ह स्टार हॉटेल सुरू केले होते. (इनसेट दाऊद)
कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. या प्रॉपर्टीच्या मुद्यावरून रोज नवनवीन बातम्या समोर येत आहे. नुकतीच छोटा शकीलने एका पत्रकाराला दाऊच्या प्रॉपर्टीच्या लिलावात सहभागी न होण्याची धमकी दिली होती. पण दाऊदची मालमत्ता केवळ मुंबईमध्येच नाही. तर जगभरातील अनेक देशांत त्याची प्रॉपर्टी असल्याची माहिती आहे.

भारताशिवाय अनेक देशांमध्ये प्रॉपर्टी
काही काळापूर्वी इंटरपोलला दाऊद आणि इकबाल मिर्चीच्या भारतासह पाकिस्तान, दुबई, तुर्कस्तान, सिंगापूर, सायप्रस, स्पेन, मोरक्को मध्येही प्रॉपर्टी असल्याची माहिती मिळाली होती. इकबाल मिर्चीने दाऊदच्या मदतीने फाइव्ह स्टार इंपिरियल सूट्स नावाने हॉटेल सुरू केले होते. ते अजूनही सुरू आहे. तसेच ब्रिटनच्या पॉश हॉर्नचर्च एसेक्समध्ये इकबाल मिर्चीने बंगला खरेदी केला होता.
टॅक्समध्ये सूट आणि दुसऱ्या नावाने जमवला पैसा
इकबाल मिर्चीने 5 देशांमध्ये दाऊदचा पैसा पोहोचवला असे म्हटले जाते. हा पैसा केवळ दाऊदची भारतातील संपत्ती विकून आलेला नव्हता तर ड्रग्जच्या व्यवसायातील हजारो कोटींचाही त्यात समावेश होता. त्या पैशातून सिंगापूरमध्ये संपत्ती खरेदी करण्यात आल्या. सायप्रसमध्ये टॅक्समध्ये सूट मिळत असल्याने दाऊदने येथे बनावट नावांनी खाती उघडली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दाऊदने खरेदी केलेल्या प्रॉपर्टीचे PHOTOS