आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेसकोडला विरोध दर्शवण्यासाठी विनाबाह्यांचा पोशाख करून महिला प्रतिनिधिगृहात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- आधुनिकतेविषयी चर्चा झाल्यास अमेरिकेचे नाव नेहमी प्राधान्याने घेतले जाते. मात्र, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील चेंबरमधून एका महिला पत्रकाराला तिच्या स्लीव्हलेस ड्रेसमुळे हाकलून दिले. यानंतर ड्रेसकोडविषयी मोठे वादंग झाले. ३० पेक्षा अधिक महिला संसद सदस्यांनी ड्रेसकोडविरुद्ध आपली भूमिका मांडली. या महिला लोकप्रतिनिधी विनाबाह्यांचे पोशाख करून प्रतिनिधीगृहात गेल्या. त्यांनी तेथे समूह छायाचित्र घेतले.  

घटनेची सुरुवात महिला पत्रकार हॅली बिअर्ड यांच्यापासून झाली. त्यांना चेंबरमधून बाहेर जाण्यास सांगितले. सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीच्या प्रतिनिधी मार्था मॅकसेली यांनी हॅलीच्या बाजूने मत मांडले. त्यामुळे वादात भर पडली. बाहेर जाण्यापूर्वी हॅली म्हणाल्या, ‘मी येथून जात आहे. परंतु त्यापूर्वी मी माझी बाजू मांडले. मी प्रोफेशनल ड्रेसकोडमध्ये आहे. हा ड्रेस स्लीव्हलेस असून शूज समोरच्या बाजूने खुले आहेत. स्पीकर महोदय, आता मी बाहेर जात आहे.’  त्यांनी म्हटले की ड्रेसकोडचे जुने नियम बदलण्याची गरज आहे. हॅलीच्या बाजूने उभे राहत प्रतिनिधी महिलांनीही आपली बाजू मांडली. ३० पेक्षा अधिक महिला लोकप्रतिनिधी विनाबाह्यांचे कपडे करून दुसऱ्या दिवशी सिनेटमध्ये हजर झाल्या. ‘विनाबाह्यांचा पोशाख’ ड्रेसकोडविरुद्ध नसल्याचे त्यांनी म्हटले. या महिला प्रतिनिधींनी सभागृह अध्यक्षांच्या लॉबीमध्ये निदर्शने केली. येथे माध्यम प्रतिनिधी संसद सदस्य वा मंत्र्यांच्या मुलाखती घेत असतात. हाऊस चेंबरच्या ड्रेसकोड नियमांनुसार महिलांनी येथे विनाबाह्यांचे ड्रेस घालण्यास बंदी आहे. पुरुषांसाठी जॅकेट आणि टाय अनिवार्य आहे.  

आपण २०१७ मध्ये असून जुना ड्रेसकोड बदलावा  
प्रतिनिधीगृह सदस्य चिली पिंग्री यांनी ड्रेसकोडविषयी ट्विट केले,  ‘हे वर्ष २०१७ आहे ! महिला मतदान करतात, कार्यालये चालवतात. आपल्या पद्धतीने राहू इच्छितात. सदनाचे नियम बदलण्याची वेळ आली आहे.’ डेमॉक्रॅटिक प्रतिनिधी लिंडा सांचेज यांनी म्हटले की, हे नियम जुनाट आहेत. आपण परंपरा कवटाळून बसलो असतो, तर येथे महिलांसाठी स्वच्छतागृहदेखील नसते.’ सभागृह अध्यक्ष पॉल रेयान म्हणाले की, ‘ड्रेस सेन्स वरून एखाद्या व्यक्तीला रोखले जावे हे मला पटत नाही. आम्ही यात बदल करणार आहोत.’
बातम्या आणखी आहेत...