आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या इमिग्रेशन बॅनविरोधात यूरोप-US मध्ये आंदोलन तीव्र; गुगल, फेसबूक अॅपलही संतप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेल्या अमेरिकेतील प्रवेश बंदीविरोधात लोकांचा विरोध तीव्र होत चालला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टनसह यूरोपमधील लंडन, पॅरिसपर्यंत ट्रम्पविरोधी आंदोलन तीव्र होत आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी एका फेडरल जजला का सस्पेंड केले यावरुनही जनतेमध्ये नाराजी आहे. ट्रम्प यांनी 27 जानेवारी रोजी सात मुस्लिम राष्ट्रांतील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंधावर बंदी घातली होती. या आदेशाला सिएटल येथील एका न्यायाधिशांनी प्रतिबंध घालणारा आदेश दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने आदेश मागे घेतले आहेत, मात्र या निर्णयाला अपर कोर्टात अपीलही केले आहे. 

लंडनमध्ये सर्वात मोठे विरोधी आंदोलन 
- ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधतील सर्वात मोठे आंदोलन ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये झाले. येथे 10 हजार लोक रस्त्यावर उतरले होते.
- ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केल्याने येथील लोक नाराज होते.
- आंदोलकांनी थेरेसा यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. 
- लोकांच्या हातातील पोस्टर्सवर लिहिले होते, मुस्लिमांना बळीचा बकरा करता येणार नाही. 
- आंदोलकांनी ब्रिटीश पीएम यांचे निवासस्थान 10 डायनिंग स्ट्रीट ते अमेरिकेच्या दुतावासापर्यंत रॅली काढली. 
- एवढेच नाही तर ब्रिटनच्या 18 लाख नागरिकांनी एका पीटिशनवर स्वाक्षरी केली. 
- या पीटिशननुसार, ट्रम्प यांच्या ब्रिटन भेटीवररही आंदोलकांनी आक्षेप घेतला. ते ब्रिटनमध्ये आले तर तो राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा अपमान असेल, असे आंदोलकांनी म्हटले आहे. 

पॅरिस - बर्लिनमध्येही आंदोलन तीव्र 
- पॅरिस - बर्लिन येथेही ट्रम्पविरोधक रस्त्यावर उतरले. 
- पॅरिस येथील रॅलीचे आयोजक 20 वर्षीय अमेरिकन नागरिक मायकल जेकब म्हणाले, 'आम्ही येथे यासाठी एकत्र आलो कारण आमचा कोणालाही विरोध नाही.'
- येथील लोकांनी घोषणा दिल्या, की 'निर्वासितांचे स्वागत आहे.'
 
अमेरिकेतील फेडरल जजला केले सस्पेंड 
- शुक्रवारी ट्रम्प प्रशासनाने एका फेडरल जजला निलंबित केले होते.
- दुसरीकडे ट्रम्प यांचे होम टाऊन असलेल्या न्यूयॉर्कमध्ये 3 हजार लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी 'डम्प ट्रम्प' अशा घोषणा दिल्या.
 
ट्रम्प यांच्‍या निर्णयावर गुगल संतप्त
ट्रम्प यांच्या यांच्‍या निर्वासितांबद्दलच्‍या धोरणामुळे अमेरिकेतील आयटी क्षेत्र हादरून गेले आहे. गुगल, अॅपल आणि फेसबुक या टेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय मूळचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेत नव्याने येणाऱ्या टॅलेंटसाठी मोठा अडथळा असल्याची टीका केली आहे. या निर्णयाचा गुगलच्या जवळपास 187 कर्मचा-यांवर परिणाम होईल, अस ते म्हणाले आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...