(फोटो: ईसीबीच्या प्रेस कॉन्फ्रन्समध्ये टेबलवर चढून कागदपत्रे फाडणारी महिला आंदोलक)फ्रँकफर्ट- जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये युरोपियन सेंट्रल बँकेचे (इसीबी) अध्यक्ष मारिओ द्राघी बुधवारी बँकेच्या नवीन योजनेवर आधारित प्रेस कॉन्फन्स परिषद घेत होते. त्याचवेळी अचानक एक महिला धावत आली आणि ती टेबलवर चढली. तिने टेबलवरील कागदपत्रे घेऊन ती फाडून उधळून लावली. तिने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. एन्ड इसीबी डिक्टेटरशिप अर्थात इसीबीने हुकूमशाही बंद करावी, असे या कागदांवर लिहिले होते.
गेल्या महिन्यात बँकेच्या विरोधात झालेल्या निदर्शनांत ती अटकेतील 350 जणांपैकी होती. इसीबी ग्रीससह इतर अनेक गरीब देशांना पैसे देत असल्याबद्दल हजारो लोकांनी आक्षेप घेतला आहे. निदर्शनात 10 हजार लोक सहभागी झाले होते. पैशांचा उपयोग देशातील नागरिकांसाठी केला जावा, अशी निदर्शकांची मागणी आहे. जेणेकरून देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यातून देशातील गरीबी दूर होईल.
मार्चमध्ये झाला होता विरोधदरम्यान, मार्चमध्ये बँकेच्या मुख्यालयासमोर पोलिसांच्या गाड्या पेटवून देण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, बँकेच्या प्रेस कॉन्फ्रन्समध्ये गोंधळ घालणार्या तरुणीचे PHOTOS