आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : शिया धर्मगुरूला मृत्‍यूदंड, इराणमध्‍ये सौदीचे दुतावास पेटवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मशाद(इराण) - अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील दोषी शिया धर्मगुरू शेख निम्र अल निम्र यांच्‍यासह एकूण 47 जणांना सौदी अरेबियाने मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्‍यामुळे जगभरातील शिया पंथीय संघटना संतप्‍त झाल्‍या असून, इराणमध्‍ये सौदी दुतावासाला आग लावण्‍यात आली. दरम्‍यान, मध्‍य आणि पूर्वेकडील शिया बहुल देशांतही याचे पडसाद उमटल्‍याचे वृत्‍त आहे.
भारतातही विरोध...
शिया धर्मगुरूला मृत्‍यूदंड दिल्‍याचे पडसाद भारत आणि पाकिस्‍तानातही उमटत आहे. जम्मू-कश्मीरमध्‍ये आंदोलनाची तयारी सुरू असल्‍याचे सूत्रांकडून कळाले.
सोशल मीडियावर व्‍हिडिओ
- इराणच्‍या दूतावासाला आग तर लावलीच. परंतु, त्‍या अगोदर दुतावासात आंदोलकांनी मोठी नासधूस केली.
- काही इराणी पत्रकारांनी याचे व्‍हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोट केलेत.
- दुसरीकडे शिया बहुल परिसरात आंदोलन अधिक तीव्र होण्‍याची शक्‍यता आहे.
- मध्य पूर्व देशांमध्ये आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी बळाचा वापर करावा लागला.
- सूत्रांनुसार, युरोपच्‍या काही भागांतही शिया पथींयांनी आंदोलन केले.
शिया नेत्‍यांनी दिली धमकी
या शिक्षेनंतर इराक, कुवैत आणि यमनमध्‍ये तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, याचा बदला घेऊ, अशी धमकी शिया नेत्‍यांनी सौदी अरबला दिली. दरम्‍यान, हा प्रकार म्‍हणजे मोठा गुन्‍हा आहे, अशी प्रतिक्रिया लेबनानच्‍या सुप्रीम शिया काउंसिलने दिली. त्‍यांनी म्‍हटले की, ही मृत्‍यूदंडाची शिक्षा आयएसआयएसच्‍या कृत्‍यापेक्षा कमी नाही.
कोण आहेत शेख निम्र अल निम्र ?
- वर्ष 2014 सौदीने 157 जणांना मृत्युदंड दिला होता.
- त्‍यामुळे 56 वर्षीय निम्र यांनी अरब क्रांतीसाठी तरुणांना सरकारच्या विरोधात भडकवले होते, असा त्यांच्यावर ठपका होता.
- गेल्या दोन दशकांतील मृत्युदंडाची ही सर्वात मोठी संख्या आहे.
- देशातील अल्पसंख्याक शिया समुदायामध्ये अन्याय होत असल्याची भावना आहे.
- सरकारविरोधी कारवायांत दोषी आढळून आल्यांची यादी ऑक्टोबरमध्येच तयार करण्यात आली होती. त्यात निम्र यांच्या नावाचाही समावेश होता.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...