आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुतिन यांच्याशी संबंधित 10 Facts? इंग्रजीत कच्चे, \'अमर\' असल्याची होते चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - दोनदा पंतप्रधान आणि दोनदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविणारे व्लादिमीर पुतिन शनिवारी आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पुतिन यांचे मोठे बंधू दुसऱ्या महायुद्धात रशियाकडून लढताना मृत्यूमुखी पडले होते. एका सामान्य घरातून येणारे पुतिन रशियन गुप्तचर संस्था केजीबीत गुप्तहेर होते. त्यांच्या कामगिरीवरून तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष येल्तसिन एवढे खूश झाले, की त्यांनी पुतिन यांना आपला राजकीय वारसदार घोषित केले. 
 

जगातील सर्वात स्टायलिश नेत्यांपैकी एक पुतिन यांचा रशियात मोठा चाहता वर्ग आहे. रशियात पुतिन यांना हिरो म्हटले जाते. इंटरनेट आणि सोशल मीडियावर फॅन्सने पुतिन यांच्या कारनाम्यांच्या एवढ्या अफवा पसरवल्या की ते आजकाल लोकांना खऱ्याच वाटतात. त्यापैकीच एक म्हणजे, पुतिन अजरामर आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक क्रॉप केलेला फोटो प्रचंड गाजला. त्यामध्ये तीन फोटो लावण्यात आले आहेत. एकामध्ये कथितरीत्या पुतिन 1920 च्या काळात लष्करी पोशाखात, दुसऱ्या महायुद्धात 1941 च्या एका फोटोमध्ये आणि त्यांचा सध्याचा एक फोटो दिसतो. एकूणच हे फोटोज दाखवून पुतिन अमर आहेत असे म्हटले जाते. पुतिन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ, त्यांच्याबद्दलचे 10 फॅक्ट्स...
 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्टायलिश राष्ट्राध्यक्षाचे आणखी काही फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...