आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनसह इस्लामिक स्टेटवरील बैठकीत पुतीन-ओबामा यांची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात शुक्रवारी युक्रेनच्या मुद्द्यावरून फोनवर चर्चा झाली. युक्रेनमध्ये इस्लामिक स्टेटच्या वाढत्या प्रसारावरही उभयतांनी चिंता व्यक्त केली, अशी माहिती अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

दरम्यान, पुतीन आणि ओबामा यांनी सिरिया तसेच अणुकराराच्या प्रकरणासह मध्य आशियातील विकासाबाबतही चर्चा केली. शत्रूंचा बीमोड करण्यासाठी मध्य आणि पश्चिम युरोपमध्ये प्रथमच अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज सैन्य तैनात करण्यात आले असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नाटोनेही या भागात लष्कर तैनातीला पाठिंबा दर्शवला आहे. मिन्स्क करारानुसार रशियाने युक्रेनमधून सर्व लष्करी तुकड्या काढून घेत आपले वचन पूर्ण करावे, असे ओबामा यांनी या वेळी बोलून दाखवले. व्हाइट हाऊसकडून जारी माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी सिरियातील परिस्थितीबाबतही गंभीर चर्चा केली. शिवाय इराणला आण्विक शस्त्रास्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी दोघांनी चर्चेत भर दिला.
बातम्या आणखी आहेत...