आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Putin Has Vanished But Rumors Are Popping Up Everywhere.

पुतिन बेपत्ता, प्रेमिकेबरोबर वेळ घालवत असल्याच्या आणि मृत्यूच्याही अफवांचे पेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जवळपास एकाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यामुळेच त्यांच्याबाबत वेगवेगळ्या अफवांना तोंड फुटत आहे. पुतिन यांची ऑलिम्पियन प्रेमिका आई बनल्याने ते तिच्याबरोबर वेळ घालवत असल्याचे सांगितले जात आहे. स्वित्झरलंडचे वृत्तपत्र बिल्कच्या एका अहवालानुसार, पुतिन हे अलीना काबायेवाबरोबर स्वित्झरलंडमध्ये आहेत.

या रिपोर्टनुसार काबायेवा यांनी बाळाला जन्म दिला आहे. 32 वर्षीय काबायेवा या रशियाच्या जिम्नॅस्टीकपटू राहिलेल्या आहेत. त्यांनी 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. घटस्फोटीत असलेल्या पुतीन यांनी अद्याप काबायेवाबरोबर असलेले नाते जगजाहीर केलेले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काबायेवा पुतिन यांच्या दोन मुलांची आईही आहे. पण अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

फ्लू, सत्तांतरण आणि मृत्यूच्याही अफवा
दरम्यान, काही अफवांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, पुतिन यांना फ्लू झाला असून ते सध्या उपचार घेत आहेत. तसेच पुतिन सत्तांतराचे शिकार ठरले असून त्यांन क्रेमलिनमध्येच कैद करून ठेवण्यात आले असल्याच्याही काही अफवा उडाल्या आहेत. अशाच एक ना अनेक अफवा पसरत असून, 62 वर्षीय पुतीन यांचा मृत्यू झाल्याच्याहीन अनेक अफवा आहेत.

राष्ट्रपतींच्या प्रवक्त्याचे स्पष्टीकरण
पुतिन यांचे प्रवक्ते दमित्री एस. पेस्कोव्ह म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे पूर्णपणे ठणठणीत आहेत.