आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियालाही व्हावे लागेल मजबूत : पुतीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे की, नाटो (उत्तर अटलांटिक सामंजस्य संघटना) सातत्याने आक्रमक होत आहे. हे पाहता आपल्या सैन्याला आणखी मजबूत व्हावे लागेल. जर्मनीच्या सोव्हिएत संघावरील हल्ल्याच्या ७५ व्या स्मृतिदिनानिमित्त रशियन संसद ड्युमाला ते संबोधित करत होते.

पुतीन म्हणाले की, रशिया पाश्चात्त्य देशांशी सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. पण ते यात स्वारस्य घेत नाहीयेत. आम्हाला त्यांच्याकडून कोणतेही सकारात्मक संकेत अद्याप मिळालेले नाहीत. दुसऱ्या बाजूने नाटो आमच्या सीमेच्या आसपास आपली ताकद वाढवत आहे.

त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवण्यासह आपली ताकद वाढवणे गरजेचे आहे. पुतीन यांनी १९३० च्या दशकाचा उल्लेख करताना सांगितले की तेव्हादेखील वैचारिक मतभेदच युद्धाचे कारण झाले होते. आज जगासमोर दहशतवाद सर्वात मोठा धोका आहे. पण जग यास नेस्तनाबूत करण्यासाठी आमच्याबरोबर येत नाही.

पोलंड, इस्टोनिया, लाटाव्हियामध्ये नाटो वाढवत आहे ताकद : अमेरिकी सैन्याच्या आगमनार्थ नाटो, पोलंड आणि बाल्टिक समुद्राचे तिन्ही देश इस्टोनिया, लाटाव्हिया, लिथुआनियाच्या तळावर आपली ताकद वाढवण्यात मग्न आहेत. मुख्य म्हणजे याचे कारण युक्रेनमधील रशियाचा हस्तक्षेप हे सांगितले जाते आहे. वर्ष २०१४ मध्ये या दोन्ही देशांच्या वादाचे क्षेत्र असलेल्या क्रिमियात रशियन सैन्य घुसले होते. रशियाने क्रिमियाला आपले राज्य वा आपलाच भूभाग असल्याचे घोषित केले होते.
बातम्या आणखी आहेत...