आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Putin Says US Helped North Caucasus Separatists Against Russia

अमेरिकेकडून चेचेन अतिरेक्यांना रशियाविरुद्ध चिथावणी : पुतीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - सध्या युक्रेनमध्ये उच्छाद मांडलेल्या चेचेन अतिरेक्यांना अमेरिकेने रशियाविरुद्ध चिथावणी दिल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. अमेरिकेने या बंडखोरांना मदतही केली असा त्यांचा दावा आहे. अमेरिकी गुप्तचर अधिकारी आणि चेचेन अतिरेक्यांच्या म्होरक्यांत झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणातून ही माहिती उघडकीस आली. रशियन गुप्तचरांनी दूरध्वनीवरील हे संभाषण पकडले होते.

रशियाच्या सरकारी रोसिया १ टीव्ही वाहिनीवर एक माहितीपट "द प्रेसिडेंट' प्रसारित करण्यात अाला. यामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची क्रेमलिनच्या सेंट अॅलेक्झांडर हॉलमध्ये घेतलेली मुलाखत दाखवण्यात आली आहे. यामध्ये हा दावा करण्यात आला आहे. २००० च्या दशकात उत्तर कॉकेशसच्या विघटनवाद्यांनी आणि अमेरिकी सिक्रेट एजंट्सदरम्यान थेट संपर्क होता.
पुतीन म्हणाले, एकदा आमच्या सिक्रेट सर्व्हिसने अझरबैजानमध्ये उत्तर कॉकेशसच्या फुटीरतावाद्यांशी अमेरिकी गुप्तचर अधिकारी बोलत असताना पकडले होते. तेव्हा मी हा मुद्दा तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यासमोर उपस्थित केला होता. संबंधित अधिकाऱ्यांना लाथ मारून हाकलले जाईल, असे त्यंानी मला आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांनंतर आमच्या गुप्तचर संस्थेला आलेल्या अमेरिकी सिक्रेट सर्व्हिसच्या पत्रात रशियात विरोधी पक्षांना पाठिंबा सुरूच राहील असे लिहिल्याचे दिसले.

१९९० च्या दशकात रशियाने चेचेन्या आणि शेजारी उत्तर कॉकेशसमध्ये मुस्लिम अतिरेक्यांशी युद्ध लढले होते. अमेरिका त्यांना समर्थन देऊन आपल्या कट्टर शत्रू देशाला संपवण्याच्या विचारात होता. हा देश रशियाच होता हे त्यानंतर उघड झाल्याचे पुतीन म्हणाले. अमेरिका केवळ त्यांची मदत करत नव्हती, तर त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहचवण्यासाठी सर्वतोपरी मदतही करत होती, असा दावा पुतीन यांनी केला.

क्रिमियाच्या विलीनीकरणावर खेद नाही : पुतीन
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनच्या क्रिमियाचे रशियात विलीनीकरण करण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. तेथील जनतेच्या इच्छेनुसार ही प्रक्रिया केल्याचा त्यांनी दावा केला. गेल्या वर्षी मार्च महिन्यातील या घटनेमुळे पाश्चिमात्य देश आणि रशियातील शीतयुद्धानंतर सर्वाधिक वाईट स्थिती निर्माण झाली होती. पुतीन म्हणाले, काळ्या समुद्रातील सामरिक महत्त्व लक्षात घेऊन क्रिमियाबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. त्या निर्णयात ऐतिहासिक न्यायाचे तत्त्व होते आणि तसे केल्याबद्दल मला खेद वाटत नाही. रशियावर निर्बंध लावण्याचा मुख्य उद्देश जागतिक शक्तीच्या रूपात पुढे येणाऱ्या देशाला रोखणे हा होता. त्यामुळे त्यांनी अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर कठोर टीका केली होती.