आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियातील निवडणुकीत पुतिन यांची बाजू मजबूत, निकालाच्या कलावरून संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियात रविवारी संसदेचे कनिष्ठ सभागृह ड्युमाच्या ४५० जागा, ७ स्थानिक संस्था आणि ३९ विभागीय संसद सदस्यांच्या निवडीसाठी मतदान झाले. सुमारे २२ तास चाललेल्या मतदानात रशियाबरोबरच भारतासह १४५ देशांतही रशियन नागरिकांसाठी मतदान केंद्रे बनवली होती. रशियन दूतावासांनी त्यासाठी ३७० केंद्रांची सुविधा केली होती. निकाल सोमवारी सायंकाळपर्यंत येतील, अशी अपेक्षा आहे, पण निकालाच्या कलानुसार अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या युनायटेड रशिया पार्टीची सत्तेवरील पकड मजबूत होण्याचे संकेत मिळत आहेत.
युक्रेनमधील क्रिमियाहा भाग रशियात समाविष्ट केल्यानंतर तेथे प्रथमच निवडणूक होत आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, आपण क्रिमियाला रशियाचा भाग मानत नाही. त्यामुळे तेथील निवडणुकीच्या निकालाला मान्यता देणार नाही. रशियाने मार्च २०१४ मध्ये क्रिमियाचा आपल्या देशात समावेश केला होता. संयुक्त राष्ट्र महासभेने तो सर्वसंमतीने अवैध मानला होता.

युक्रेनमध्ये हिंसाचार : युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये मतदानादरम्यान काही लोकांनी रशियन दूतावासावर हल्ला केला. त्यांची पोलिसांशी चकमक उडाल्याने मतदान रोखावे लागले. युक्रेनमधील संसद सदस्य हल्लेखोरांचे नेतृत्व करत होते. आपण नागरिकांना दूतावासात जाऊन मतदान करण्यासाठी परवानगी देणार नाही, असा इशारा युक्रेनच्या सरकारने दिला होता.
बातम्या आणखी आहेत...