आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात आम्हाला अडथळा आणणाऱ्यांना धडा शिकवू, पुतिन यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन. (फाइल फोटो) - Divya Marathi
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन. (फाइल फोटो)
मॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत की, सिरियामध्ये त्यांच्या लष्कराला अडथळा ठरणाऱ्यांना ते धडा शिकवणार आहेत. शुक्रवारी मॉस्कोमध्ये डिफेन्स मीटींगदरम्यान त्यांनी हा इशारा दिला. गेल्या महिन्यात तुर्कस्तानने सिरियामध्ये रशियन फायटर जेट पाडले होते. पुतीन यांची धमकी ही याचेच रिअॅक्शन मानले जात आहे.

पुतीन यांचा इशारा...
- फ्री सिरियन आर्मीचे 5,000 मेंबर गव्हर्नमेंट ट्रूप्सबरोबर दहशतवाद्यांच्या विरोधात लढत आहेत.
- पण सिरियामध्ये असलेले जिहादी आमच्यासाठी मोठा धोका ठरले आहेत.
- आमची आर्मी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरला नुकसान पोहोचवणाऱ्या कोणत्याही गटाला आम्ही उध्वस्त करू.
- रशियन आर्मीला मी तशे ऑर्डर देतो.
सिरियाचा किती भाग IS च्या ताब्यात
- रशियाचे संरक्षण मंत्री सर्गे शोइगू यांनी सांगितले की, इस्लामिक स्टेटने सिरियाच्या 70 भागावर ताबा मिळवला आहे.
- IS चे 60,000 फायटर इराक आणि सिरियामध्ये लढत आहेत.

रशियाचा ISIS तळांवर प्रथमच पाणबुडीवरून क्षेपणास्त्र हल्ला
- गेल्या बुधवारी रशियाने सिरियामध्ये ISIS च्या तळांवर प्रथमच पाणबुडीवरून क्षेपणास्त्र हल्ला केला होता.
- 2400 किमी अंतरावरून कॅस्पियन सागरातून हा हल्ला करण्यात आला.
- हल्ल्यानंतर पुतीन म्हणाले होते की, आम्हाला अणु हल्ल्याची गरज पडणार नाही, अशी आशा आहे असे वक्तव्य पुतीन यांनी हल्ल्यानंतर केले होते.

सिरियातील स्थिती...
- सिरियामध्ये सुमारे गेल्या चार वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. याठिकाणी फ्री सिरियन आर्मीसारखे अनेक गट असद यांच्या विरोधात लढत आहेत.
- इस्लामिक स्टेटनेही सिरियातील अनेक भागांवर ताबा मिळवला आहे.
- या सर्व परिस्थितीत असद यांना सत्ता टिकवणे कठीण झाले आहे.

सिरियाच्या मुद्द्यावर रशिया आणि अमेरिकेसारखे देश समोरासमोर का ?
- अमेरिकेला सिरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांना पहावरून हटवायचे आहे. तर रशियाले खुले आम असद यांना पाठिंबा दर्शवते.
- असद यांचे लष्कर इस्लामिक स्टेट आणि पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या बंडखोरांच्या विरोधात लढत आहे. तर रशिया असद यांच्या आर्मीच्या पाठिशी आहे.
- मीडिया रिपोर्टस् नुसार सिरियामध्ये ISIS सक्रिय नसलेल्या भागातही रशिया हल्ला करत असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
- या भागामध्ये सिरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या विरोधात काम करणाऱ्या अनेक संघटना अॅक्टीव्ह आहेत.
- रशियाने काही दिवसांपूर्वी तुर्कस्तानच्या एअरस्पेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अमेरिका अधिक भडकला.
- रशियाबरोबर सिरिया, ईराण आणि इराक सारखे देथ आहे. तर विरोधात अमेरिकेच्या नेतृत्त्वात ब्रिटन, तुर्कस्तानसह इतर देश आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS
बातम्या आणखी आहेत...