आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतीन यांचे निकटवर्तीय टिलर्सन यांच्याकडे परराष्ट्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संकेत, मीडियात चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खाते रेक्स टिलर्सन यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. रेक्स हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जातात.
ट्रम्प यांनी ट्विटरवरून लवकरच देशाच्या नवीन परराष्ट्र मंत्री पदाची घोषणा केली जाईल, असे म्हटले होते. परराष्ट्र मंत्री पदाच्या शर्यतीत मॅसाच्युसेट्सचे माजी गव्हर्नर मिट रोमनी यांचे नावही होते. परंतु रोमनी यांनी परराष्ट्र मंत्रती पदाचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला होता.
त्याच्या काही तासांतच अमेरिकेच्या प्रसार माध्यमांंनी टिलर्सन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
टिलर्सन परदेशात मोठा उद्योग चालवतात. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते विद्यमान परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांची जागा घेतील.
टिलर्सन यांच्याबद्दल ट्रम्प म्हणाले, टिलर्सन या पदावर आल्यानंतर माझा एक फायदा आहे. ते अनेक दिग्गजांना चांगले आेळखतात. टिलर्सन रशियाशी उद्योग पातळीवर मोठे सौदे करतात. त्यांचे हे सौदे कंपनीसाठी असतात. स्वत:साठी नाही.
फेर मोजणीतही ट्रम्प विजयी, २२ हजारांनी हिलरी पराभूत

विस्कॉन्सिन व पेन्साल्विनियामधील राज्यस्तरीय झालेल्या फेर मतमोजणीत ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा २२ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.
दुसरीकडे देशातील मतदान प्रक्रियेत बदल करण्याची मागणी करणारी ग्रीन पार्टीची याचिका अमेरिकेच्या एका न्यायालयाने फेटाळून लावली. मिशिगनमध्ये फेर मतमोजणी करण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली. ट्रम्प यांनी ६० लाख मतांपैकी सुमारे ४४ हजार मतांनी पराभव केला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...