आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या अजगराने असे काही विचित्र खाल्ले की झाला लगेच मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)- तुमची जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त चाऊ नके, अशी इंग्रजीत म्हण आहे. ती या अजगराच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरली आहे. येथील एका अजगराने साळिंदर गिळला. त्यानंतर तो बाहेर काढण्याचा निष्फळ प्रयत्न केला. अखेर त्या अजगराचा मृत्यू झाला.
पोर्ट स्टिफन्सजवळ लेक इलॅंड गेम रिझर्व्हच्या रस्त्याशेजारी एक 13 फुटी आफ्रिकन रॉक अजगर मृतावस्थेत सापडला. त्याच्या मृत्यूमागचे कारण शोधण्यासाठी पोट फाडण्यात आले. तेव्हा वन अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्याने साळिंदर खाण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत रिझर्व्हचे जनरल मॅनेजर जेनिफर फुलर यांनी सांगितले, की अजगराच्या मृत्यूने नेमके कारण अजूनही सापडले नाही. अजगराने साळिंदर गिळल्यावर त्याचे अनेक काटे पोटातील पचनाच्या मार्गात अडकले होते. त्यानंतर अजगराने साळिंदर बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. पण तेही शक्य झाले नाही.
पुढील स्लाईडवर बघा, कसा झाला अजगराचा मृत्यू... असे पोट कापून बाहेर काढले साळिंदर...
(फोजो सौजन्य: Caters News Agency)