आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Queen Victorias 125 Year Old Undergarment Sold On 11 Lakh Rupees

Auction महाराणी व्हिक्टोरीयाच्या अंतर्वस्त्रासाठी साडे अकरा लाखांची बोली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साडे 11 लाखांत विकले गेलेले राणीचे अंतर्वस्त्र - Divya Marathi
साडे 11 लाखांत विकले गेलेले राणीचे अंतर्वस्त्र
लंडन - ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीयाच्या अंतर्वस्त्राची जोडी एका ब्रिटीश महिलेने लिलावात विक्रमी 12,000 पाऊंड (सुमारे 11 लाख 79 हजार रुपये) मध्ये खरेदी केली आहे. विल्टशायरमध्ये चिपनहॅम ऑक्शन रूमचे रिचर्ड अॅडमंड्स म्हणाले की, व्हिक्टोरीयाच्या शाही अंतर्वस्त्राचा हा विक्रमी लिलाव आहे.

एका बेवसाईटनुसार हे अंतर्वस्त्र 1890 चे असून अझूनही चांगल्या स्थितीत आहे. हे अनेक वर्षांपासून ससेक्सच्या यस्टरडेज वर्ल्ड म्युझियमच्या टेम्प्रेचर कंट्रोल स्टोअर रूममध्ये टिशू पेपरमध्ये ठेवण्यात आले होते. अँडमंड्स यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराणी व्हिक्टोरिया यांचा 1901 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कपडे शाही कुटुंबातील सदस्यांना दिले जात होते. हे अतर्वस्त्र खरेदी केलेल्या महिलेने शाही कुटुंबाशी संबंधित इतरही अनेक वस्तू खरेदी केल्या.