आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना; भारतवंशीय अमेरिकी समुदायांशी चर्चा करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यांचा हा २ आठवड्यांचा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान ते जागतिक स्तरावरील विचारवंतांची व राजकीय नेत्यांची भेट घेतील. काँग्रेसच्या अनिवासी भारतीय भेट अभियानांतर्गत राहुल अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. ते सर्वप्रथम कॅलिफोर्निया विद्यापीठातील सभेमध्ये सहभागी होणार आहेत. ‘सत्तरीतील स्वतंत्र भारत : आगामी वाटचाल’ या विषयावर ते येथे भाषण करणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात भारताचा समावेश होतो. या लोकशाहीच्या स्थित्यंतराविषयी राहुल बोलणार आहेत. त्यांचे भाषण एेकण्यासाठीची नावनोंदणीची मर्यादा संपली असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.  

सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर वरिष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि काँग्रेसच्या अमेरिका युनिटचे अध्यक्ष शुध सिंग त्यांचे स्वागत करतील. १९४९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठात भाषण केले होते, असे काँग्रेसचे प्रवक्ते मधू गौड यासखी यांनी सांगितले. येथील भारतीय समुदायासह राहुल यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच अस्पेन इन्स्टिट्यूटमधील विचारवंतांशी ते चर्चा करणार आहेत, अशी माहिती मधू गौड यांनी दिली. वॉशिंग्टन डीसी येथे राहुल राजकीय नेते,प्रशासनातील उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...