आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत राहुल म्हणाले; होय, मी 2019 मध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्यास तयार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्कले (कॅलिफोर्निया) - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 2 आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात करताना येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसकडून पीएम पदाचा उमेदावर होण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यासोबत भाजप आणि पीएम मोदींच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी वंश परमपरेवर आपल्याच शैलीत विरोधकांना उत्तर दिले आहे. 
 

पीएम मोदी चांगले वक्ते
पीएम मोदींवर बोलताना राहुल म्हणाले, की मोदी त्यांच्यापेक्षा चांगले वक्ते आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी मोदींच्या मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत मोहिमेचे कौतुकही केले. मात्र, मोदींच्या परराष्ट्र धोरणांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी अमेरिका आणि भारताचे अतूट आणि मजबूत मैत्री होती. असे असूनही भारताने आपले इतर मित्र रशिया आणि इराणसह शेजाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नव्हते. 
 
 
2019 मध्ये पीएम पदाचा उमेदवार
2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार होणार का यावर राहुल गांधींनी होकारात उत्तर दिले आहे. मात्र, हा निर्णय काँग्रेस पक्षाने बहुमताच्या आधारावर चर्चेतून घ्यायचा आहे. विशेष म्हणजे, याबाबत पक्षात विचार सुरू असल्याचे देखील राहुल यांनी सांगितले आहे. 
 
 
हे होते सत्ता गमावण्याचे कारण
काँग्रेस उपाध्यक्षांनी 2014 मध्ये आपण का पराभूत झालो याचे कारण सांगितले आहे. काँग्रेस पक्षात एक प्रकारचा अहमभाव आला होता. हेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण होते अशी कबुली राहुल यांनी दिली आहे. खरे पाहता याची प्रचिती 2012 मध्येच आली होती असेही ते पुढे म्हणाले. 
 
 
वंशपरमपरेवर काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये एकाच कुटुंबाची सत्ता आणि वंश परमपरेवर भाजपसह अनेक पक्षांकडून नेहमीच टीका केली जाते. यावर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल यांनी विनोदी शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, "यूपीत अखिलेश यादव, दक्षिण भारतात स्टॅलिन आणि चक्क बॉलिवुडमध्ये अभिषेक बच्चनसह बिझनेस क्षेत्रात अंबानींचे पुत्र सुद्धा वंशपरमपरेवर आले आहेत. यात काहीच गैर नाही. खरा सवाल हा की ती व्यक्ती त्या पद आणि जबाबदारीसाठी सक्षम आणि संवेदनशील आहे किंवा नाही!"
 
 
देशात हिंसाचार, द्वेष वाढला
देशात सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडताना राहुल म्हणाले, "सद्यस्थितीला हिंसाचार, द्वेष आणि राग इत्यादींसह ध्रुवीकरणाचे राजकारण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या असो वा बीफच्या संशयावरून जमावाकडून होणाऱ्या हत्या, अशा प्रकारच्या घटना पाहून लाखो लोकांना आपल्या देशात आपले काहीच भविष्य नसल्याचे वाटते. अशा गोष्टींमुळे लोक एकाकी पडले असून देश कट्टरतावादाकडे झुकत आहे."
 
पुढील स्लाइडवर पाहा, व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...