आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raising Kashmir Issue By Pakistan In Un Is Clear Interference India

भारताने पाकला सुनावले; काश्मीर मुद्दा मांडणे म्हणजे ‘थेट हस्तक्षेप’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र- संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणे हा पूर्णपणे गैरलागू विषय आहे. एवढेच नव्हे तर तो अंतर्गत कारभारात ‘स्पष्ट हस्तक्षेप’ आहे, अशा शब्दांत भारताने गुरुवारी पाकिस्तानला सुनावले.

काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि राहील. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत अभिषेक सिंह यांनी पाकिस्तानला देशाची भूमिका सांगितली. खरे तर पाकिस्तानने ‘आत्मपरीक्षण करण्याचा आपला अधिकाराचा’ अगोदर उपयोग केला पाहिजे. अर्थात देश कोणत्या दिशेने मार्गक्रमण करू लागला आहे, याचे अवलोकन केले पाहिजे. त्यानंतरच त्यांना अनेक गोष्टी समजू लागतील. दरम्यान, पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोढी यांनी काश्मिर मुद्दा आमसभेत उपस्थित केला होता. काश्मिर मुद्दा शांततामय मार्गाने सोडवण्यात आला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. काश्मिरसंबंधी कोणतीही शांतता चर्चा बिनशर्त झाली पाहिजे. अटींवर चर्चा होता कामा नये, असे लोढी यांचे म्हणणे होते. लोढींचे म्हणणे पूर्णपणे गैरलागू होते. किंबहुना भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणारे आहे. पाकिस्तानसोबत आमचे राजनयिक संबंध आहेत. म्हणूनच एका विशिष्ट चौकटीत राहून उभय देशांत चर्चा झाली पाहिजे. अंतर्गत मुद्दा अशा प्रकारे दुसऱ्या देशाने भलत्याच ठिकाणी मांडू नये, असे सिंह यांनी स्पष्ट केले.