आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे राजस्‍थानची सर्वात श्रीमंत आमदार, दोन वर्षांत केवळ सहा विकास कामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामिनी जिंदल - Divya Marathi
कामिनी जिंदल
श्रीगंगानगर - राजस्‍थानमधील भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण झालेत. श्रीगंगानगर जिल्‍ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचे चार तर जमीनदारा पक्षाचे दोन आमदार आहेत. यापैकीच एक कामिनी जिंदल आहेत. राजस्‍थानातील सर्वात श्रीमंत आमदार म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. एवढेच नाही तर त्‍या श्रीगंगानगर शहराच्‍या पहिल्‍या महिला आमदार आहेत. त्‍यांनी जमीनदारा पार्टीकडून निवडणूक लढवत भाजपचे राधेश्याम गंगानगर यांना तब्‍बल 37 हजार मतांनी मात दिली होती. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे त्‍यांनी दोन वर्षांत केलेल्‍या कामाबद्दल...
197 कोटींच्‍या संपत्‍तीची मालकीन
कामिनी यांनी दिल्‍लीच्‍या जवाहरलाल नेहरू कॉलेजमधून एमए केल्‍यानंतर आपल्‍या वडिलांच्‍या पक्षात प्रवेश केला. वर्ष 2013 मध्‍ये झालेल्‍या राजस्‍थान विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी त्‍यांनी आपली संपत्‍ती 197 कोटी रुपये दाखवली होती. त्‍या जिल्‍ह्यातील पहिल्‍या महिला आमदार आहेत. शिवाय राजस्‍थानातील 199 आमदारांपैकी त्‍या सर्वात तरुण आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आश्‍वासनांचे काय झाले ?