आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये राजस्थानी बँड करणार मोदींचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिकर - पॅरिसमध्ये मोदी यांच्या स्वागतासाठी राजस्थानातील बँड असेल. जिप्सी धोद बँड. त्याला भारताचा सांस्कृतिक राजदूत म्हटले जाते. पॅरिसमध्ये हा देशातील एकमेव बँड असेल. त्याचे प्रमुख कलाकार रहिस भारती पॅरिसहून ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, स्वागत समारंभ म्युझियम ऑफ लूब्रमध्ये होईल. त्याला सुमारे ३ हजार व्हीआयपींचीही हजेरी लावतील. बँडचे एक वर्ष आगाऊ बुक झाले आहे. अमेरिका-कॅनडातील सुमारे ४० शहरांतून ते आपल्या कलेचे प्रदर्शन करतील. रहिस सिकरच्या धोद गावातील रहिवासी आहेत.

फ्रान्समध्ये स्थायिक: वर्ष २००० मध्ये संगीत शिकण्यासाठी फ्रान्सला गेले होते. आता ८ हजार ग्रुपमध्ये आघाडीवर.
वैशिष्ट्ये : ६ संगीतकार, एक नृत्यांगना, भवई नृत्यात निष्णात. तलवारीच्या धारेवर चालण्यात पारंगत.
सन्मान : ८५ देशांत सादरीकरण, ग्रीस ऑलिम्पिक व राणी एलिझाबेथ यांच्या हीरक महोत्सवात सहभाग.