आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाककडून दहशतवादाचा सरकारी धोरणासारखा वापर; भारत-बहरिनने पाकला फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनामा- एका देशात दहशतवादी म्हटला जाणारा अन्य देशात स्वातंत्र्यसैनिक कसा ठरू शकतो. खरे तर पाकिस्तान दहशतवादाचा सरकारी धाेरणासारखा वापर करू लागले आहे, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह बहरिनचे गृहमंत्री शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांनी फटकारले आहे. गृहमंत्री बहरिनच्या दौऱ्यावर असून दाेन्ही देशांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

राजनाथ सिंह त्यांचे समकक्ष शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकात दहशतवादाच्या विरोधात एकत्र लढाईचा संकल्प करण्यात आला. दहशतवाद हे सर्व देशांवरील संकट आहे, असे मत उभय नेत्यांनी व्यक्त केले आहे. रशीद म्हणाले, भारतासोबत दहशतवादाच्या विरोधात लढाईत बहरिन खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहे. दहशतवादाचा धार्मिक, संस्कृतीशी संबंध नाही, असे भारत बहरिनला वाटते. हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीचा खात्मा झाला. तो एका देशात दहशतवादी आहे. मग तो दुसऱ्या देशात स्वातंत्र्यसैनिक ठरू शकत नाही. त्याचे उदात्तीकरण करता येऊ शकत नाही; परंतु पाकिस्तान मात्र दहशतवादाला सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून वापरू पाहत आहे. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर कायम तणाव दिसून येतो. जम्मू-काश्मीरही पाकिस्तानमुळेच अशांत आहे, असे भारताकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम
भारत- बहरिन यांच्यात सैनिकांच्या पातळीवर विविध प्रकारचे प्रशिक्षण, संमेलनांचे आयोजन करण्यास दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे. उभय देश दहशतवादाच्या प्रकरणात परस्परांना माहितीची देवाण-घेवाण करतील. तज्ज्ञांची मदतही परस्परांना पुरवली जाणार आहे. त्याशिवाय दोन्ही देशांनी मानवी तस्करीच्या विरोधात कडक पावले उचलताना सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली.
बातम्या आणखी आहेत...