आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यावर झालेला बलात्कार जगासमोर मांडायचा आहे, पीडिता अंबेर अमौर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केप टाऊन (दक्षिण आफ्रिका)- एखाद्या बालिकेवर, तरुणीवर किंवा महिलेवर झालेला लैंगिक अत्याचार घृणास्पद असतो. बऱ्याच वेळा समाजाच्या दबावामुळे या अत्याचारांना वाचा फुटत नाही. उलट पीडितेलाच दोष दिला जातो. तुझीच चुकी होती असे सांगितले जाते. पण दक्षिण आफ्रिकेतील एका रेप पीडिताने अशा गुन्ह्यांविरुद्ध आवाज उठवला आहे. अंबेर अमौर असे या तरुणीचे नाव आहे. तिच्यावर झालेला शारीरिक अत्याचार सोशल साईट्सच्या माध्यमातून जगासमोर मांडला आहे. वाईट अनुभव डोळ्यांत आसवे आणत शेअर केले आहेत. ती सांगते, की माझ्यासोबत जे काही झाले ते मी लपवू शकत नाही. मला ते जगासमोर मांडायचे आहे.
'स्टॉप रेप' कॅम्पेन
27 वर्षीय अमौर दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये राहते. ती स्टॉप रेप कॅम्पेनला प्रमोट करीत आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून ती बलात्कारासंदर्भात जनजागृती करीत आहे. या दरम्यान शकीर नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. अमौरने शकीरच्या घरी गरम पाण्याचा शॉवर घेतला होता. यावेळी तिच्यावर बलात्कार झाला होता. अमौरने इन्साग्रामवर रडतानाचा फोटो टाकला आहे.
गप्प बसायला नको
अमौर म्हणाली, की मी सर्व बलात्कार पीडितांना आवाहन करते, की त्यांनी गप्प राहू नये. बोलायला हवे. मला जाणिव आहे, की मी काय सांगत आहे. त्यामुळेच मी माझा फोटो शेअर केला. त्या दिवशी नेमके काय घडले ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
तेव्हा मी बाथरुममध्ये होती
अमौरने सांगितले, की मी अगदी सहज हे सांगत आहे. हे अनुभवाच्या आधारावर आहे. हा गुन्हा घडला तेव्हा मी बाथरुममध्ये होती. मला वाटले नव्हते, की मी उभी राहु शकेन. मी टाईप करायला सुरवात केली. ही घटना घडल्यावर मी हॉस्टेलवर परत आली. माझी मैत्रिण नीकसाठी मी एक चिठ्ठी सोडली होती.
त्याने दारु घेतली होती
मी शकीरला भेटले होते. यापूर्वी त्याने मला सोबत नेण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. त्याने मला एकदा किसही केला होता. त्या दिवशी त्याने दारु घेतली होती. तो घरी जाण्याच्या अवस्थेत नव्हता. त्यामुळे मी त्याला घरी सोडले. त्यानंतर परतत होते. तेव्हा तो माझ्या मागे आला. त्याने मला शॉवर घेण्याचा आग्रह केला. मी तयार झाले.
मला थकवा जाणवत होता
अमौरने सांगितले, की माझ्या हॉस्टेलवर कायम प्रचंड गार पाणी असते. गेल्या दोन दिवसांपासून मी थकले होते. मला गरम पाण्याचा शॉवर घ्यायचा होता. मी त्याच्या बाथरुममध्ये गेले. यावेळी तोही सोबत होता. त्याने माझ्या गुडघ्यांवर दाब टाकला. मी त्याला थांबवले. पण तो आणखीच आक्रामक झाला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, अमौर म्हणते पुरावे राहिले नाहीत.... फोटो टाकले इन्साग्रामवर... बघा तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट....
बातम्या आणखी आहेत...