आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WARNING: ब्लू व्हेल पेक्षा घातक आहे हा गेम, खेळणारे होतात बलात्कारासाठी प्रवृत्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन/टोक्यो - भारतासह जगभरात ब्लू व्हेल गेमची दहशत पसरली असताना आणखी एका गेमपासून सावध होण्याची वेळ आली आहे. ब्रिटनच्या रेपले नामक या गेमने जगभरात खळबळ माजली आहे. रेल्वे आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, ब्रिटन आणि जपानच्या संसदेने या गेमवर बंदी लावली आहे. 
 

ब्लू व्हेलपेक्षा घातक रेपले
- रेपले नावाचा हा गेम लॉन्च होण्याच्या 3 वर्षांतच प्रतिबंधित झाला. जगभरात त्यावर बंदी सुद्धा लावण्यात आली आहे. तरीही हा गेम आजही इंटरनेटवर उपलब्ध असून मुले-मुली लपून तो गेम डाऊनलोड करत आहेत. ब्लू व्हेल गेमसह या गेमपासूनही पालकांनी सावध व्हावे हा या वृत्ताचा हेतू आहे. 
- ब्लू व्हेल हा गेम जीव देण्यासाठी विवश करतो. मात्र, रेपले हा गेम दुसऱ्यांचा खून करण्यासाठी चिथावणी देतो. एवढेच नव्हे, तर हा गेम बलात्कार करण्यासाठी एवढा प्रवृत्त करतो की ते खेळणारे भर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा मुलींची छेड काढणे किंवा अतीप्रसंग करायला लागतात.
- अशात केवळ ब्लू व्हेल नव्हे, तर आपल्या पाल्यांना रेपले पासून सुद्धा सावध करण्याची वेळ आली आहे. सायबर जगतात असे कित्येक गेम्स आहेत, ज्यावर बंदी असतानाही ते छुप्या संकेतस्थळांवर किंवा टोरेंट प्लॅटफॉर्मवरून डाऊनलोड केले जातात. अशा प्रकारचे गेम समाजात बॉम्बपेक्षा घातक आहे.
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा... या गेमचा विळखा...
बातम्या आणखी आहेत...