आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISचा म्होरक्या बगदादीच्या जेवणात विष कालवले, प्रकृती गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसूल- दहशतवादी संघटना ISIS चा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी याच्या जेवणात विष कालवण्यात आले आहे. त्याला आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांना गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक माध्यमांच्या सूत्रांनी ही माहिती सोमवारी दिली. निनेवेच्या बेआज जिल्ह्यात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांना कोणत्या रुग्णालयात दाखल केले हे मात्र सांगण्यात आले नाही. या वृत्तांतानुसार बगदादीच्या जेवणात विष कालवणाऱ्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. इतर तीन कमांडर कोण आहेत हे अद्याप कळू शकले नाही. बगदादीने अल कायदापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, दरम्यान, अबू बकर अल बगदादी मारला गेल्याचा दावा इसिसशी संबंधित एका अरब वृत्तसंस्थेने यापूर्वी केला होता. ‘अल अमक’ या वृत्तसंस्थेने हा दावा करताना म्हटले आहे की, अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सैनिकांनी केलेल्या कारवाईत बगदादी गंभीर जखमी झाला होता. आता त्याचा मृत्यू झाला आहे. 12 जूनलाच बगदादीस लक्ष्य करून मित्रराष्ट्रांच्या विमानांनी जोरदार हवाई हल्ले केले होते. यात तो मारला गेला असल्याचे मानले जाते. सप्टेंबर 2014 एप्रिल 2015 मध्येही बगदादी मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, बगदादीवर एक कोटी डॉलर्सचे बक्षीस...
बातम्या आणखी आहेत...