वॉशिंग्टन - ओसामा बिन लादेनचा खातमा होऊन सुमारे चार वर्ष उलटली आहेत. पण त्याने जगभरात केलेल्या दहशतवादी कारवाया आजही अंगावर शहारे आणतात. अमेरिकेच्या मॅनहट्टन फेडरल कोर्टात नुकतीच लादेनचा लेफ्टनंट राहिलेल्या खालेद अल-फवाजवरील खटल्यांची सुनावणी झाली. त्यात लादेनचे अेक दुर्मिळ फोटो पुरावे म्हणून सादर करण्यात आले. हे सर्व फोटो प्रथमच समोर आले आहे.
फोटो - नोव्हेंबर 1996 मध्ये टोरा-बोराच्या डोंगरांमध्ये लपलेला लादेन.
अमेरिकेत 9/11 हल्ला आणि अमेरिकेने मोस्ट वाँटेड दहशतवादी ठरवण्याच्या अनेक वर्षांपूर्वीची ही छायाचित्रे अफगाणिस्तानातील टोरा बोरा येथील आहेत. त्यावेळी लादेन गोपनीय पद्धतीने राहत होता. अल कायदाचे बळ वाढवण्याचे काम तो लपून करत होता.
अफगानिस्तानात दिली होती मुलाखत
लादेनने टिव्हीवर पहली मुलाखत सीएनएनच्या पीटर अर्नेस्ट आणि पीटर बर्गन यांना 1997 मध्ये दिली होती. त्याचा सहकारी अल-फवाजने ही मुलाखत घडवून आणली होती. एका वर्षानंतर एबीसी न्यूजच्या जॉन मिलरने लादेनला मुलाखत दिली. मुस्लिम देशांनाही लादेनबाबद माहिती द्यावी यासाठी पॅलिस्टीनी पत्रकार अब्देल बारी अटवान ला नोव्हेंबर 1996 मध्ये अफगानिस्तानात बोलावून त्याने पहिली मुलाखत दिली होती.
मुस्लिम देशांना संदेश
लादेनने अमेरिकेच्या विरोधात युद्ध पुकारण्याची घोषणा केली होती. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत विशेषतः अरब देशांपर्यंत हा संदेश पोहोचवू इच्छित होता. त्याने मुलाखतीसाठीही अटवानची निवड केली होती. त्याचे कारण म्हणजे लंडनमधून निघणारे त्याचे अरेबिक साप्ताहिक 'अल-क्वादस अल-अराबी'मध्ये याआधी अरबी साम्राज्य आणि 1991 मध्ये झालेल्या खाड़ी युद्धावर टीका केली होती.
अटवाननेच सर्वात आधी लादेनच्या पहिल्या फतव्याची बातमी ब्रेक केली होती. त्याने सौदी अरबमध्ये असलेल्या अमेरिकन सैनिकांच्या विरोधात फतवा दिला होता. अटवानने सांगितले की, लादेनची मुलाखत घेतल्यानंतर दोन वर्षांनी स्कॉटलंड यार्डच्या गुप्तहेरांनी अल-फवाजच्या घराची झडती घेतली होती. त्याठिकाणीच त्यांना लादेनची दुर्मिळ छायाचित्रे मिळाली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेच्या कोर्टात सादर करण्यात आलेले लादेनचे इतर काही दुर्मिळ PHOTO. यात अल-फवाज आणि पॅलिस्टीनी पत्रकार अटवान सोबत दिसून येत आहेत.