आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : निवडणुकीत पराभवानंतर आत्महत्येचा विचार करत होते ओबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2009 मध्ये अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनत इतिहास रचणारे बराक ओबामा आज (4 ऑगस्ट) रोजी 54 वर्षांचे झाले आहेत. एक काळ असाही होता जेव्हा निवडणुकीतील पराभव आणि पत्नी मिशेल यांच्या रागावण्यामुळे ओबामा आत्महत्या करण्याचा विचार करू लागले होते. अॅडवर्ड क्लेन यांच्या 'द अॅमेच्योर' या पुस्तकातील माहितीनुसार, ओबामा 2000 मध्ये जेव्हा शिकागोमधून निवडणुकीला उभे होते, त्यावेळी मिशेल रागावल्या होत्या. ओबामांनी निवडणूक लढवू नये असे त्यांचे मत होते. त्यामुळे ओबामा चांगलेच निराश झाले होते.

ओबामा आत्महत्या करतील की काय अशी भीती त्यांच्या मित्रांना वाटायची. तर इकडे मिशेल ओबामांनी घटस्फोटाचे पेपरही तयार केले होते. ओबामांनी आपले म्हणणे ऐकले नाही, त्यामुळे त्या निराश झाल्या होत्या. त्यावेळी ओबामा आणि मिशेल यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. 2000 मध्ये शिकागो येथील सीटवर त्यांची स्पर्धा बॉबी रश यांच्याशी होती. अखेरच तेच झाले, ज्याची मिशेल यांना भीती होती. ओबामा या निवडणुकीत पराभूत झाले. ओबामांचे राजकीय जीवन संपले की काय असे त्यांना वाटले. ओबामांसाठी हा काळ अत्यंत कठीण होता. पण तरीही मिशेल यांनी त्यांना सहानुभुती दाखवली नाही. मात्र, त्यानंतर काही महिन्यांनी दोघांनी मतभेद दूर केले.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या ओबामांबाबत आणखी काही बाबी, तसेच पाहा त्यांचे बालपणापासूनचे Photo