आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याठिकाणी अजूनही आहे रावणाचा मृतदेह, विभीषणकडून झाली होती घोडचूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रावणाच्या वधाबाबत मतभेद कायम आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या पुरातत्व विभागाने दावा केला होता की, रावणाचा मृतदेह श्रीलंकेच्या रेगला या जंगलात उपलब्ध आहे. रावणवधानंतर रावणाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी विभीषणकडे सोपविण्यात आली होती. मात्र सिंहासन सांभाळण्याच्या गडबडीमुळे विभीषण रावणाचा मृतदेह तेथूच सोडून आला. त्यानंतर नागकुलच्या लोकांनी हे शव नेले. त्यांना विश्वास होता की, रावण पूर्णत: मेला नसून तो जिवंत होऊ शकतो. मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी रावणाचे शव अनेक प्रकारचे रसायने वापरून ममी म्हणून जतन केले. 

 

मानले जाते की, रेगलाच्या घनदाट जंगलामध्ये एक विशाल पर्वत आहे यामध्ये असलेल्या गुहेत हे शव ठेवण्यात आले आहे. या गुहेत नागकुल वंशाचे लोक आणि भयावह प्राणी या शवाचे संरक्षण करताहेत. रावणाचे ताबूत तब्बल 18 फूट लांब आणि पाच फूट रूंदीचे आहे. त्यामुळे रावणाचे शव हजारो वर्षानंतरही शाबूत आहे. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - फोटोज...

बातम्या आणखी आहेत...