आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ray Tomlinson Dead: Inventor Of Email Dies Aged 74

ईमेलचे जनक, जगाला ईमेल @ चिन्ह देणारे रे टॉमलिन्सन यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- जगाला ईमेल देणारे आणि मेसेजमध्ये @ हे चिन्ह वापरणारे रे टॉमलिन्सन यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र, जगाला त्याची बातमी तीन दिवसांनी कळाली. ७४ वर्षीय टॉमलिन्सन यांना २०१२ मध्ये इंटरनेटचे हॉल अॉफ फेम म्हणून निवडण्यात आले होते. वेगवेगळ्या नेटवर्क्सवरील कॉम्प्युटर्सदरम्यान इलेक्ट्रॉनिक मेसेज पाठवता येतील अशी सिस्टिम त्यांनी त्यांनी १९७१ मध्ये तयार केली. तेव्हा कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करत असताना त्यांनी पहिला आधुनिक ईमेल पाठवला होता. त्यात ‘QWERTYUIOP’ ही अक्षरे होती. पारंपरिक इंग्रजी कीबोर्डच्या पहिल्या पंगतीत हीच अक्षरे असतात. ईमेल आजही जगातील सर्वात प्रभावी इलेक्ट्रॉनिक संवाद यंत्रणा आहे. @च्या वापराबाबत ते म्हणाले होते, मी युजर आणि कॉम्प्युटरचे नाव विलग करण्याचा मार्ग शोधत होतो. यासाठी वेगवेगळ्या काॅम्प्युटर्सहून स्वत:लाच शेकडो टेक्स्ट मेसेज पाठवले. पण ते लक्षात ठेवणे अवघड होते. यामुळे @ चा वापर केला.