आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'मोदींना माहीत नाही ते कोणाला आव्हान देत आहे, आमचा प्रत्येक जण लढण्यास सज्ज\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद मियांदादला सर्जिकल स्ट्राइक आणि युद्धाच्या शक्यतेवर उत्तर दिले. - Divya Marathi
पाकिस्तानच्या समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद मियांदादला सर्जिकल स्ट्राइक आणि युद्धाच्या शक्यतेवर उत्तर दिले.
इस्लामाबाद - पाकिस्तानी नेत्यांसोबत आता तिथेल सेलिब्रिटीही भारताविरोधात बरळायला लागले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार जावेद मियांदादने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. एवढेच नाही तर त्याने भारतीय जनतेला चिथावण्याचाही प्रयत्न केला. मियांदाद म्हणाला, मोदींना माहित नाही त्यांनी कोणत्या समाजाला आव्हान दिले आहे. आमचा प्रत्येकजण शहादतसाठी तयार आहे. जावेद मियांदाद हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा व्याही देखील आहे. पाकिस्तानचा आणखी एक माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान शांतताप्रिय देश असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाला मियांदाद...
- पाकिस्तानच्या समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद मियांदादला सर्जिकल स्ट्राइक आणि युद्धाच्या शक्यतेवर प्रश्न विचारण्यात आला होता.
- मियांदादने या प्रश्नाच जे काही उत्तर दिले त्यातील बराच भाग येथे लिहिणेही शक्य नाही.
- तो म्हणाला, 'चीन-पाकिस्तान कॅरिडोर तयार होत असल्यामुळे भारताचा जळफळाट होत आहे. भारतीय नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी ........ विरोधात मैदानात उतरावे. रस्त्यावर उतरावे आणि त्याला साफ करावे. कारण तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या देशात काही लोक असे आहेत जे स्वतःसाठी तुम्हाला मारायला बसले.'
- मी क्रिकेटच्या निमित्ताने भारतात अनेकदा गेलो आहे. तिथे फिरत असताना मी पाहिले आहे की तिथली जनता अशी नाही. नरेंद्र मोदी साहेब असे व्यक्ती आहेत ज्यांच्या .......चा पत्ता नाही. ते कोणाच्या मांडीवर आहेत आणि काय खेळ खेळत आहे हे तर माहित नाही, मात्र त्यांना हे माहित नाही की ते कोणत्या समाजाला आव्हान देत आहेत.
- आम्ही तर प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहोत. पाकिस्तानची लहान-लहान मुले देखील तयार आहेत. त्यांची इच्छा आहे की मृत्यू आला तर शहीदाचा असाव. मी देखील त्यासाठी तयार आहे. त्यांना तर जशास तसे उत्तर दिले पाहिजे. भारतीय हे फार घाबरट आणि भित्रे लोक आहे. त्यांची तर कोणती आर्मी देखील नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मियांदादची चिथावणीखोर भाषा....
बातम्या आणखी आहेत...