आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी मुलगी चार महिन्यांची असतानाच धरला जिमचा रस्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमची मोठी मुलगी मालिया 4 महिन्यांची असतानाची ही गोष्ट आहे. बराक नियमितपणे व्यायाम करायचे. त्यांच्या व्यायामामुळे वैताग आला होता. मालिया झोपेतून उठण्यापूर्वी मीसुद्धा व्यायाम करू शकते, असे मी एकेदिवशी ठरवले. तेव्हापासून मी पहाटे ४.३० वाजताच जिममध्ये जायला लागले. जिममध्ये जाण्याच्या सुरुवातीचा काळ माझ्यासाठी सुखदायी होता. मी जिममध्ये तंदुरुस्तीसाठी खूप घाम गाळते. फिजिकल आणि इंटर्नल एक्झरसाइज करते. मला तंदुरुस्तीचे महत्त्व समजायला वेळ लागला; परंतु आमच्या मुलींना व्यायामात लवकर रुची निर्माण व्हावी, असे मला वाटते. मुलींच्या मते, वाढत्या वयाची मला कधीच काळजी वाटली नाही. माझी आई सध्या ७५ वर्षांची असून मलासुद्धा सत्तरीपर्यंत फिटच राहायचे आहे. युवावस्थेत असताना मी मनमर्जीने काहीही खाऊ शकत होते. मात्र, आता काही खायचे म्हटले की तेवढा व्यायामही करावा लागतो. म्हणूनच मी वेगवेगळ्या प्रकारे व्यायाम करत असते. यात फक्त कार्डियोच नाही, तर शरीर लवचिक राहावे यासाठी पिलेट्स आणि स्ट्रेचिंगसुद्धा करते, असे मिशेल सांगतात.

राष्ट्रपतींच्या फिटनेस परिषदेचे सदस्य कॉर्नेल मॅकक्लिन हे मिशेल ओबामा यांचे ट्रेनर असून ते सांगतात की, मिशेल वेटलिफ्टिंगसोबतच ट्रायसेप्स, पुशडाऊन आणि हॅमर कर्ल्सही करतात. त्या वयाच्या चाळिशीपर्यंत थांबण्यापेक्षा तत्काळ वर्कआऊट सुरू करण्याच्या बाजूने आहेत. व्यायाम केल्यास त्यांचा दिवस चांगला जात नाही, असे मिशेल यांना वाटते.

चर्चेचे कारण : व्यायाम करतानाचा त्यांचा व्हिडिओ नुकताच जारी झाला आहे.

मिशेल ओबामा
- जन्म- १७जानेवारी १९६४
- उंची-फूट११ इंच
- वजन-७७किलो
- शिक्षण-हार्वर्डस्कूल ऑफ लॉमधून पदवीधर.
- सिडनी ऑस्टिन लॉ फर्ममध्ये नोकरीस असतानाच बराक ओबामा यांच्याशी भेट झाली.

मिशेल यांचे वर्कआऊट
- ट्रेडमिल करते, मात्र त्यापेक्षा मनगटांच्या व्यायामास माझी अधिक पसंती असते.
- सुरुवातीला दोरीवरच्या काही उड्या मारल्याने पायाचे स्नायू तसेच हातांचीही व्यायामासाठीची पूर्वतयारी होऊन जाते.
- त्यानंतर मेडिसिन बॉलसह अॅब वर्कआऊट. बेेंचवर स्क्वेड इन आणि स्क्वेडआऊट करते.
- इनक्लाइन बेंच प्रेस करताना दोन्ही हातांत ३५ पाउंड वजन उचलते.
- हात डोळ्यांच्या समन्वयासाठी किक बॉक्सिंगही करते.

आहार
- आहारात मला फ्रेंच फ्राइज, बर्गर आणि सर्व प्रकारचे फास्ट फूड आवडतात. आवडीचा आहार मिळाल्यास दु:ख होते. त्वचेच्या देखभालीसाठी त्वचा तज्ज्ञांकडे जाण्याइतका मला वेळ नाही, परंतु पहाटे ४.३० वाजता उठण्यासाठी मी रात्री १० च्या आधी झोपण्याची नियमितपणे काळजी घेते.

- वयाच्या ५३ व्या वर्षीही बराक यांचे सिक्स पॅक अॅब्स आहेत हे विशेष. ते जिममध्ये येण्यापूर्वीच मी नेहमी तिथे हजर असते. त्यांच्या येण्यापूर्वी माझा जवळपास निम्मा व्यायाम झालेला असतो. त्यानंतर ते येतात. व्यायाम करते वेळी बराक यांना "व्हिप माय हेअर' हे संगीत ऐकायला आवडते.
कॅलरीज मोजत बसणे मला आवडत नाही. दिवसातून अनेकदा खाते
नाष्टा - फ्राइड व्हेेजिटेबल्स,टोफू किंवा ओट्समील, फळाचे काही तुकडे आणि व्हाइट हाऊसमधील पोळांमधून काढण्यात आलेले मध तसेच कधी कधी प्रोटीन शेक घेते.
दुपारचे जेवण - मासे,भाजीपाला, ब्राऊन राइस किंवा आलू इ. चीझ जास्त टाकलेला आटा ब्रेडचा व्हेज पिझ्झा सर्वाधिक आवडतो.
रात्रीचे जेवण - मांसाहार,कोणतेही अन्न, भाजी सॅलड. शरीर बारीक करण्याची इच्छा झाल्यास फक्त सॅलड आणि खूप भूक लागल्यास प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करते.

(प्रिव्हेन्शन, डेली बिएस्ट, ओपरा विन्फ्रे यांच्या मॅगझिन अँड हॉलीवूड लाइफमधून घेतलेला मजकूर)
बातम्या आणखी आहेत...