अक्षय कुमार आणि निमरीत कौर यांचा बहुचर्चित एअरलिफ्ट हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेस्क्यू ऑपरेशवर हा चित्रपट आधारित आहे. 1990 मधील सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची सध्या सगळीकडे मोठ्या प्रमणावर चर्चा सुरू आहे. युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांना अगदी सुखरुप घरी परत आणण्यात यावेळी यश आले होते.
हे ऑपरेशन अत्यंत मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले होते. एअर इंडियाच्या विमानांच्या मदतीने सुमारे 1 लाख 70 हजार भारतीयांना यशस्वीरित्या मायदेशी परत आणले होते. उद्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला, या ऑपरेशनबाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. नेमके हे ऑपरेशन कसे राबवण्यात आले. त्यासाठी किती परिश्रम करावे लागले, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे राबवले 59 दिवसांचे हे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन...