आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Black Money: स्विस बँकेत जमा होणाऱ्या पैश्यांची भारताला मिळणार रियल टाइम आकडेवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - स्विस बँकेतून काळा पैसा आणण्याच्या दिशेने मोदी सरकारचे आणखी एक पाऊल पडले आहे. स्वित्झरलंडच्या संसदीय समितीने एका अत्यंत महत्वाच्या कराराला मंजुरी दिली आहे. हा करार पूर्णपणे मंजूर झाल्यास भारताला स्विस बँकेत भारतीयांकडून जमा होणाऱ्या पैश्यांची रियल टाइम आकडेवारी मिळणार आहे. या कराराला ऑटोमॅटिक इंफॉर्मेशन एक्सजेंज पॅक्ट असे नाव देण्यात आले आहे. संसदीय समितीने मंजूर केलेला प्रस्ताव आता हिवाळी अधिवेशनात सुरू होणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवला जात आहे. हे अधिवेशन 27 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 

 

 

> स्वित्झरलंडच्या आर्थिक व्यवहार आणि कर विषयक आयोगाने रविवारी झालेल्या बैठकीत बहुमताने या पॅक्टला मंजुरी दिली. हा आयोग वरिष्ठ सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांची संसदीय समिती आहे.
> या कराराचा केवळ भारतालाच नाही, तर इतर 40 देशांना फायदा होणार आहे. त्या देशांनी सुद्धा स्वित्झरलंडसोबत कराराचा प्रस्ताव मांडला होता. समितीने प्रस्तावाला मंजुरी देतानाच सहकारी राष्ट्रांना त्यांच्याकडील कर विषयक कायदे आणखी कठोर करण्याचा सल्ला दिला आहे. 
> या कराराला संसदेचीही मंजुरी मिळाल्यास कुठल्याही भारतीयाने स्विस बँकेत पैसा जमा केल्यास त्याची आकडेवारी थेट भारत सरकारला मिळणार आहे. यात त्याची खासगी मालमत्ता आणि त्याने दिलेले आणि न दिलेले कर या सर्व बाबींची माहिती सुद्धा उपलब्ध होणार आहे. 
> 2018 पर्यंत हा करार प्रत्यक्षात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही त्याची अंमलबजावणी 2019 पूर्वी होणे शक्य नाही. या करारामुळे स्विस बँकेत जमा होणारा पैसा काळा आहे की पांढरा आणि तो नेमका कुणाचा आहे याची सर्वस्वी माहिती भारताकडे उपलब्ध होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...